नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोलीत मोठा स्फोटकांचा साठा जप्त

गडचिरोली, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नक्षल Naxals घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्रव स्फोटक साहीत्याचा वापर करतात असे मोठे साहित्य गडचिरोलीी Gadchiroli पोलिसांच्या हाती लागले आहे . असे साहित्य नक्सली मोठया प्रमाणात खरेदी करुन ठेवतात व जंगल परिसरातील जमिनीत गोपनियरित्या पुरुन ठेवतात, तसेच काही ठिकाणी रस्ते तसेच सुरक्षा दलांना धोका होवू शकेल अशा इतर ठिकाणी स्फोटके, शस्त्र साहित्य व दारुगोळा इत्यादी ते गोपनियरित्या जमिनीत पुरुन ठेवतात.

Gadchiroli police have seized a large quantity of explosives used by Naxals to carry out violent acts.

पोलिसांनी police नक्षलविरोधी अभियानाचे आयोजन करुन सी-६० व इतर अभियान पथकाचे जवान मिळून उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोस्टे पुराडा हद्दीमध्ये मौजा लवारी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षलवाद्यांनी गोपनियरित्या जंगल परिसरात लपवून ठेवलेला शस्त्र व स्फोटकांचा साठा शोधुन काढण्यात जवानांना खुप मोठे यश आले आहे.

सदर डंपमध्ये त्यांना कुकर बॉम्ब १ नग, नक्षल पॅन्ट १ नग, नक्षल शर्ट १ नग, पिटु १ नग,शाल १ नग, प्लॅस्टिक शिट १ नग, बॅन्डेज पट्टी १ नग, चिमटा १ नग, व्हॅसलीन डब्बी १ नग, बॅटरी (हेलॉसिटी) १ नग, स्प्रिंग १ नग, ३०३ साली केस १ नग, एसएलआर खाली केस १ नग, पेंचीस १ नग , पुस्तके ३ नग व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

यापैकी कुकर बॉम्ब हे अत्यंत सतर्कतेने यशस्वीरित्या जागेवरच नष्ट करण्यात आले असून इतर साहीत्य गडचिरोली येथे आणण्यात आलेले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.

नक्षलवाद्यांच्या Naxals २८ जुलै ते ०२ ऑगस्ट या कालावधी दरम्यान होणाऱ्या नक्षलसप्ताहाच्या  Naxalsपार्श्वभुमीवर नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जात असून जिल्हयात नक्षलविरोधी Naxals अभियान तीव्र करण्यात आले आहे.

ML/KA/PGB

26 July 2021