
नागपूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मकरसंक्रात निमित्त गुरुवारी नागपूरात पतंगबाजीला उधाण आले असून निळ्या आकाशात रंगीबेरंगी पतंगांची गर्दी झाल्याचे दिसत आहे. नागपूरात सर्वत्र मोठ्या आनंदाने मकरसंक्रात हा सण साजरा केला जात आहे. लहान मुलेही या पतंगबाजीत सहभागी होत आहे. घरोघरी नागरिक एकमेकांना तीळ गूळ देऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत आहे.
नागपूरात तब्बल 300 च्या वर दुकाने पतंग विक्री करीता थाटली असून गेल्या 4-5 दिवसात नायलॉनच्या मांज्यामुळे 3 जणांचा गळा कापून मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा नायलॉनच्या मांजा विक्री आणि खरेदी करणाऱ्यांवर पोलीस गुन्हे दाखल करीत आहेत. याशिवाय मनपातर्फे कठोर दंड सुद्धा ठोठावण्यात येत आहे.
Tag- Nagpur-Makarsankranti
ML/KA/DSR/14 JANUARY 2021