मेळघाटात ढगफुटीचा परिणाम, सेमाडोह – माखला मार्ग खचला…

अमरावती, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती जिल्ह्यात मेळघाटात सततच्या पावसामुळे सातपुडा पर्वत रांगेतील जवळपास दीड किलोमीटरची कडा खचल्याने सेमाडोह-माखला, चुनखडी मार्गावर चिखल, झाडे, मोठ मोठ्या दगडांचा खच लागला आहे.

शनिवारी जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि व्याघ्र प्रकल्प कर्मचारी पावसामुळे खराब झालेल्या मार्गाची पाहणी करण्याकरीता गेले असता ही बाब त्यांच्या लक्षात आली.

सेमाडोह ते माखला मार्गात रस्त्यावर आलेल्या पहाडावरील झाडे व मातीतून वाट काढूनच ग्रामस्थांना मार्गक्रमण करावं लागत आहे.

पहाडाची दरड कोसळल्याने मेळघाटातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून यंत्रणेच्या साहाय्याने मार्ग मोकळा करण्यासाठी बांधकाम आणि व्याघ्र प्रकल्प चे कर्मचारी युद्ध स्तरावर प्रयत्न करत आहेत.

ML/KA/PGB

26 July 2021