रविवार ११ जुलै रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लाॅक

रविवार ११ जुलै रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लाॅक

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रुळांची दुरुस्ती ,ओव्हरहेड वायर दुरुस्ती व सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार ११ जुलै रोजी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लाॅक घेण्यात आला आहे.  (Megablack on all three railway lines on Sunday 11th July)

मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण अप व डाउन (Thane-Kalyan up and down) धीम्या मार्गावर सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत डाउन धीम्या – अर्धजलद मार्गावर मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर Thane, Diva and Dombivali stations थांबणार आहे. तर अप धीम्या मार्गावर कल्याण – मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या असून डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबणार आहेत. (Megablack )

हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी – वांद्रे डाउन मार्गावर सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० दरम्यान व चुनाभट्टी – वांद्रे- सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून वाशी – बेलापूर – पनवेल दरम्यान व सीएसएमटी स्थानकातून वांद्रे – गोरेगाव स्थानकात जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल बंद राहणार आहेत. तर अप हार्बर मार्गावर पनवेल – बेलापूर – वाशी स्थानकातून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या व गोरेगाव – वांद्रे स्थानकातून सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या लोकल बंद राहणार आहे. (all three railway lines) तर दुरुस्तीच्या कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येत आहेत. तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर माहीम – अंधेरी स्थानकांदरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी १०.३५ ते ३.३५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून गोरेगाव स्थानकात जाणाऱ्या लोकल सेवा बंद राहणार आहेत. तर चर्चगेट – गोरेगाव दरम्यान लोकल बंद राहणार आहे.

Repair work has been undertaken on Central Railway’s Thane-Kalyan up and down slow route from 11 am to 4 pm. During this period, the down-slow route has been diverted from Mulund to Kalyan stations. It will stop at Thane, Diva and Dombivali stations. On the slower route up between Kalyan-Mulund stations, the up route has been diverted and will stop at Dombivali, Diva, Thane stations.

SW/KA/PGB
10 July 2021