मे महिन्यात निर्यातीत 69 टक्के वाढ: व्यापारी तूटही कमी झाली

मे महिन्यात निर्यातीत 69 टक्के वाढ: व्यापारी तूटही कमी झाली

नवी दिल्ली, दि.17(एमएमसी न्यूज नेटवर्क): निर्यातीच्या आघाडीवर एक चांगली बातमी आहे. मे महिन्यात निर्यातीत (Export) वर्षिक 69 टक्के वाढ झाली आहे. मागील महिन्यात 32.3 अब्ज डॉलर किंमतीची वस्तूंची निर्यात झाली. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे कमकुवत बेस इफेक्ट (base effect). म्हणजेच कोव्हिडमुळे (covid-19) गेल्या वर्षी याच महिन्यात निर्यात खुपच कमी झाली होती.

दुसर्‍या लाटेतही मे 2019 पेक्षा निर्यात 8 टक्के जास्त
In the second wave, exports are 8 per cent higher than in May 2019

चांगली बातमी म्हणजे महत्वाच्या परदेशी बाजारपेठेत भारतीय वस्तूंची मागणी (Demand) वाढली आहे. या वर्षी मेमध्ये कोव्हिडची (covid-19) दुसरी लाट असतानाही मे 2019 च्या तुलनेत निर्यात (Export) 8 टक्क्यांपेक्षा जास्त झाली. वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या प्राथमिक आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.

वस्तूंच्या निर्यातीत सलग तिसर्‍या महिन्यात वाढ
Exports of goods increased for the third consecutive month

वस्तूंच्या निर्यातीत (Export) सलग तिसर्‍या महिन्यात वाढ झाली आहे, जे व्यापाराला बळकटी मिळण्याचे संकेत आहेत. कोव्हिडच्या (covid-19) आधी निर्यातीच्या वाढीचा दर संथ होता ही वस्तुस्थिती आहे. 2018-19 मध्ये निर्यातीत सुमारे 9 टक्के वाढ झाली होती तर 2019-20 मध्ये 5 टक्के कमी झाली होती. अशा परिस्थितीत जुन्या सर्वोच्च पातळीवर जाण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतील.

आयात देखील वाढली, 38.6 अब्ज डॉलरची निर्यात
Imports also increased, to 38.6 billion doller

तज्ञांचे म्हणणे आहे की अभूतपूर्व संकट आणि टाळेबंदी दरम्यान मे मधील वाढलेल्या निर्यातीची आकडेवारी उत्साहवर्धक आहे. मात्र मे मध्ये आयात देखील 74 टक्क्यांनी वाढून 38.6 अब्ज डॉलरवर पोचली आहे. याचे कारणही कमकुवत बेस आणि मागणीत (Demand) झालेली वाढ आहे.

मे 2019 च्या पातळीपेक्षा आयात 17 टक्के कमी आहे
Imports are 17 percent lower than the May 2019 level

मात्र आयात (Import) मे 2019 च्या पातळीपेक्षा 17 टक्के कमी आहे. या मे महिन्यात पेट्रोलियम आयात 179 टक्क्यांनी वाढून 9.5 अब्ज डॉलरवर गेली. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीतील वाढ हे त्याचे कारण होते. बेस इफेक्टमुळे सोन्याची आयातही 790 टक्क्यांनी वाढून 67.9 कोटी डॉलरवर गेली. वनस्पती तेलाची आयात 149 टक्क्यांनी वाढून 1.4 अब्ज डॉलरवर गेली.

व्यापारी तूट 6.3 अब्ज डॉलर
Trade deficit 6.3 billion doller

अलिकडच्या काही महिन्यांतील परकीय व्यापारातील तेजी देशातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील मागणीत वाढ झाल्यामुळे ती पूर्ण करण्याच्या स्थितीत असल्याचे दर्शवते. दरम्यान, व्यापारी तूट (Trade deficit) वेगवान घसरणीसह 6.3 अब्ज डॉलरच्या आठ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. यावर्षी एप्रिलमध्ये व्यापारी तूट 15.1 अब्ज डॉलर होती.

आंतरराष्ट्रीय व्यापारात बदल घडण्याची चिन्हे
Signs of change in international trade

विश्लेषकांच्या मते, येत्या काही महिन्यांत निर्यात (Import) उच्च पातळीवर राहिली तर ते आंतरराष्ट्रीय व्यापारात बदल घडून येण्याचे संकेत असतील. गेल्या वर्षी कोव्हिडमुळे परदेशी व्यापारात मोठी चढउतार झाली होती. गेल्या महिन्यात वाणिज्य सचिव अनुप वाधवन म्हणाले होते की कोव्हिडमुळे (covid-19) येत्या काही महिन्यांत निर्यातीमधील वाढ कमी होणार नाही.

There is good news on the export front. Exports grew by 69 per cent year-on-year in May. Exports were valued at 32.3 billion dollers last month. The biggest reason behind this is the weak base effect. This means that exports were significantly lower this month due to covid.

PL/KA/PL/17 JUNE 2021