महाविकास आघाडीचा बंद फसला …

महाविकास आघाडीचा बंद फसला ...

कोल्हापूर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. हा महाराष्ट्र बंद फसला आहे, बंद करायला त्यांच्याकडे लोकच नाहीत , हा बंद फसल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे . Mahavikas Aghadi failed ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

लखीमपूरमध्ये घटलेली घटना दुर्दैवी असून त्यावरून चौकशी होऊन कारवाई होऊ शकते,The incident in Lakhimpur is unfortunate and could lead to an inquiry and action, असे ते म्हणाले.लखीमपूर घटनेचा भाजपशी तसंच उत्तर-प्रदेश आणि केंद्र सरकारशी काय संबंध आहे हे मला कळत नसल्याचं त्यांनी म्हटलं.महाराष्ट्र बंदची हाक कळण्यापलीकडे असल्याचं त्यांनी सांगितलं.जो काही बंद आहे तो भितीनं असल्याचा टोला त्यांनी लगावला. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने हे कृत्य केल्याचा आरोप झाला . त्याला अटक झालीय, चौकशी होईल आणि सत्य काय ते समोर येईल असं चंद्रकांत पाटील म्हणाले. Chandrakant Patil said that there will be an inquiry and the truth will come out. घटना उत्तर प्रदेशात घडलीय आणि त्यासाठी महाराष्ट्र बंद करतायत. आज जो काही बंद केलाय तो फसलेला आहे. जो आहे तो भितीने आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

नवरात्रीच्या काळात तुम्ही एसटी, बेस्ट बंद केल्यात. भक्त आणि व्यापारी नाराज झालेत. बंदमुळे शेतकऱ्यांना समाधान नाही पण नाराजी वाढली. येणाऱ्या निवडणुकीत याचे परिणाम दिसतील. बंदचा निषेध करतो असंही चंद्रकांत पाटील Chandrakant Patil  म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला भारतीय जनता पक्षानं आक्षेप घेत बंदला विरोध केला आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या या महाराष्ट्र बंदला आमचा विरोध असल्याचं भाजपने म्हटलं आहे.

ML/KA/PGB

11 Oct 2021