वेट लॉस स्टोरी: महिलेने केले 30 किलो वजन कमी

फिटनेस जर्नी शृंखलेमधील आजची आमची गोष्ट आहे गृहिणी, दिव्या बर्मन यांची, ज्यांनी तंदुरुस्त होण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. वजन कमी करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनशैली मध्ये कायकाय बदल केले चला पाहूया.

 

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क) : लठ्ठपणामुळे नातेवाईक करायचे कुचेष्टा, वाईट वाटल्याने या महिलेने केले 30 किलो वजन कमी
वजन वाढणे ही आजकाल प्रत्येकासाठी एक मोठी समस्या आहे. बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे वजन वाढण्याचे प्रमाण देखील वाढत आहे . लठ्ठपणा केवळ आरोग्याच्या समस्याच वाढवत नाही तर बर्‍याच प्रमाणात आत्मविश्वासही कमी करतो. वाढत्या वजनाने दिव्या समोर देखील अनेक अडचणी उभ्या केल्या होत्या. दिव्या बर्मनसाठी लठ्ठपणा ही एक अशी समस्या बनली होती, ज्यामुळे तिला आपल्या मुली सोबत खेळता येत नव्हते. एकदा एका नातेवाईकाने दिव्याच्या लठ्ठपणाबद्दल खूप वाईट टिप्पणी केली त्यानंतर मात्र दिव्याने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या आहार आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करण्यास सुरूवात केली.

दिव्याने आपल्या आहार आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करून केवळ वजनच कमी केले नाही तर तिच्यात खूप आत्मविश्वास देखील आला आहे. जर तुम्हाला दिव्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाविषयी जाणून घ्यायचे असेल तर आम्ही तुम्हाला तिचा व्यायाम आणि आहाराबद्दल माहिती देणार आहोत. तिने केवळ 5 किंवा 10 किलोच नव्हे तर संपूर्ण 30 किलो वजन कमी केले…. तेही एका वर्षाच्या आत.

• नाव – दिव्या बर्मन
• व्यवसाय- गृहिणी/प्रमाणित आहारतज्ज्ञ
• वय – 34 वर्ष
• उंची – 5 फुट 2 इंच
• शहर – नोएडा

कधी मिळाली कलाटणी

दिव्या बर्मन यांनी आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाच्या सुरूवातीच्या काळाविषयी सांगितले – ‘मी नुकतीच आई झाली होती आणि गरोदरपणामुळे माझे वजन बरेच वाढले होते. यामुळे लवकरच समस्या सुरु झाल्या. पाठदुखीपासून ते अगदी चालण्यापर्यंत समस्या सुरू झाल्या. इतकेच नाही तर मी माझ्या मुलीला जास्तवेळ कडेवर उचलून देखील घेऊ शकत नव्हती. मला खूप वाईट वाटायचे. समस्या आणखी वाढू लागल्या. मला माझ्या आकाराचे कपडे सहज मिळत नव्हते. मी माझ्या वयापेक्षा 10 वर्षांनी मोठी दिसायचे. अशा परिस्थितीत मी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.

आहार

• न्याहारी – उकडलेले अंडी, आमलेट, पोहे, बेसनपोळी, पराठे (वेगवेगळ्या दिवशी)
• दुपारचे जेवण – थोडे किंवा किंवा बिना तेलाची एक वाटी डाळ, दोन पोळ्या, एक वाटी हिरवी पालेभाजी, कधीतरी भात.
• रात्रीचे जेवण – बिना तेलाचे लेमन चिकन, खिचडी, वेज पुलाव, एक पोळी कोणत्याही भाजीसोबत.
• व्यायामाच्या आधीचे खाणे- काही नाही
• व्यायामाच्या नंतरचे खाणे – न्याहरीसह भिजवलेले बदाम.

व्यायाम

वजन कमी करण्याच्या आपल्या प्रवासाबद्दल दिव्या बर्मन म्हणाल्या- मी वजन कमी करण्यासाठी झुम्बा, बॉडीवेट प्रशिक्षण, किक बॉक्सिंग, सूर्य नमस्कार आणि दोरीउड्या मारणे सुरू केले. सोबतच, दररोज 10 हजार पावले चालणे देखील दिनचर्यामध्ये समाविष्ट केले.
उत्साही/प्रेरित कशा राहिल्या.

स्वत: ला उत्साही ठेवण्यासाठी, मी वेगवेगळे व्यायाम करण्यास सुरूवात केली. कधीकधी मला व्यायाम करायचा कंटाळा यायचा किंवा इच्छा नसायची तेव्हा मी स्वत:लाच समजवायचे आणि वेगवेगळे व्यायाम करून मन एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न केला. सोबतच करमणुकीसाठी किकबॉक्सिंग आणि वेट-ट्रेनिंग सुरू केले.

वजन कमी करण्याच्या प्रवासामधील सर्वात वाईट काळ

‘मला नेहमीच वजन कमी करायचं होतं आणि त्यासाठी मला बर्‍याच वेळा टीकेचा सामना करावा लागला. मला बॉडी शेमिंगसारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागले ज्यामुळे मला खूप वाईट वाटले. माझ्या एका नातेवाईकाने मला सांगितले की मी कधीही वजन कमी करू शकत नाही. त्यानंतर मी त्यांना चुकीचे सिद्ध करण्याचा आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.

जीवनशैलीमध्ये बदल

‘सर्वात आधी मी माझा आहार बदलला आणि हळू हळू माझ्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश केला. आजही मी व्यायाम चुकणार नाही याची पूर्ण काळजी घेते आणि दररोज कमीतकमी 10,000 पावले तरी चालते. ज्या दिवशी मी व्यायाम करू शकत नाही किंवा चालत नाही, त्यादिवशी मी माझ्या लहान मुलीसोबत खेळते आणि घरातच फेऱ्या मारते किंवा नृत्य करते. अशी प्रत्येक गोष्ट करते ज्यामुळे कॅलरी बर्न होतील.’

वजन कमी केल्यामुळे काय शिकले?

‘मला वाटते की प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे आणि त्याबद्दल गंभीर असले पाहिजे. जर आपण व्यायाम करू शकत नसाल तर कमीतकमी दैनंदिन आयुष्यात सक्रिय राहा. शक्य असल्यास आपल्या दिनचर्येत एका खेळाचा समावेश आवश्य करा. हळूहळू तुम्हाला व्यायाम करायला मजा वाटेल. यासोबतच, मी लोकांना आहाराविषयी सजग राहण्याचा सल्ला देखील देईन.’

 

Tag- lifestyle-weight-loss

DSR/SW/KA/DSR/ 9 JANUARY 2021