तुमचा मूड आणि मानसिक स्वास्थ्य (mental health) सांभाळण्यासाठी करा महत्वाचे 7 बदल

मुंबई दि. ८ (एमएमसी न्‍यूज नेटवर्क) : आहार आणि जीवनशैलीमध्ये काही गुणात्मक बदल आणून मनोदशा आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होऊ शकते. तज्ज्ञांनी योग्य मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी लाइफस्टाइलमध्ये खालील बदल सुचविले आहेत…..

नैसर्गिकरीत्य मूड सुधारणे:- तुमच्या जीवनशैलीचा तुमच्या स्वास्थ्यावर चांगला-वाईट परिणाम होऊ शकतो, उदा. एका दिवसात तुम्ही किती चालता (walking). यासारख्या अनेक उपाय करून तुम्ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारू शकता. गतिहीन जीवनशैली असणे आणि त्यामुळे वजन वाढणे मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने लाभकारक नाही आणि आयुष्य नकारात्मक बनवू शकते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण साधारण जीवनात काही लहान सहान बदल आणून तुम्ही तुमचा मूड कायम चांगला ठेवू शकता. यासोबत पूरक पोषण आहार असणे गरजेचे आहे. आपल्या जीवनशैलीची गुणवत्ता ढासळत चालली आहे. असंतुलित आहार, अनियमित व्यायाम, दारू आणि तंबाखूचे सेवन हे जणू जीवनाचा भागच झाले आहेत. त्यामुळे निरोगी मनासाठी जीवनात काही आमूलाग्र बदल आणणे आवश्यक आहे. —

1. नियमित व्यायामाचे मानसिक, सामाजिक और चिकित्सीय फायदे आहेत. यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यासारख्या जोखिमीच्या न्यूरोलॉजिकल आजारांपासून स्वतःला सुरक्षित ठेवता येऊ शकतं. यात नियमितता असणे फार गरजेचे आहे कारण याचा तुमच्या विचारसरणीवर देखील परिणाम होतो. व्यायाम माणसाला सकारात्मक बनवते म्हणजेच आणि स्मरणशक्ती वाढते.

2. व्यायामाने मस्तिष्क-व्युत्पन्न न्यूरोट्रॉफिक कारक (BDNF) स्तरात वृद्धि आणून औदासिन्य नाहीसं करण्यात काम करतं. BDNF एकमेव असे न्यूरोट्रॉफिक तत्व आहे ज्याने शरीरातील अ‍ॅन्टीडिपेंटेन्ट्स सक्रिय होतात.

3. तुम्ही घेतलेल्या सकस आणि संतुलित आहाराचा संबंध- तुमची मनोवस्था, वर्तन आणि अनुभूती यांच्याशी असतो. मानसिक आरोग्यासाठी आहार संबंधीच्या सूचना फार महत्वाच्या ठरतात कारण बरेच आहारतत्व न्यूरोप्रोटेक्टिव असतात.

4. सुदृढ मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी मूल्यवान घटक – विटामिन डी, फोलिक एसिड आणि आवश्यक ओमेगा -3 फैटी एसिडचे महत्व असते. ओमेगा -3 स्तर कमी झाल्यास गेलास औदासिन्य आणि सिज़ोफ्रेनिया सारखे विकार माणसाच्या मागे लागू शकतात.

5. सजग व्हा- मानसिक आरोग्यासाठी मद्यपान आणि धूम्रपान टाळावे.

6. आजच्या वेगवान जीवनामुळेही अनेक तणाव उत्पन्न होतात आणि ते आपल्या कल्पनेपेक्षा अधिक हानिकारक असतात. स्वस्थ मेंदू आणि तंदुरुस्त शरीरासाठी ताणतणाव व्यवस्थापनाच्या रणनीतींचा अवलंब करण्याचा प्रयत्न करून बघा.

7. आपल्या आवडत्या घडामोडींकडे लक्ष द्या. यामुळे तणाव कमी होईल आणि मेंदूला एक आराम मिळेल.

मानसिक आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येची लक्षणे दिसत असतील, किंवा दैनंदिन कामे सफाईदारपणे करण्यात काही अडचणी येत असतील तर एखाद्या विशेषज्ञाची मदत घेण्यास मागे-पुढे पाहू नका.

 

TAG- lifestyle-mental-health

DSR/KA/DSR/8 JANUARY 2021