कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर  

नाशिक, दि. 11, (एम एम सी न्युज नेटवर्क):- नाशिक येथील कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा साहित्यक्षेत्रातील प्रतिष्ठेचा  जनस्थान पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार समितीचे अध्यक्ष अडव्हॉकेट विलास लोणारी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 1 लाख रुपये रोख सन्मान पत्र आणि सन्मान  चिन्ह अस या पुरस्काराचे स्वरूप आहे. एकवर्ष आड हा पुरस्कार दिला जातो.  तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या स्मृती दिनी 10 मार्च ला  या पुरस्काराचे वितरण होणार आहे. जेष्ठ साहित्यीक कै तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या प्रेरणेतून  जनस्थान आणि गोदा गौरव पुरस्कार  वर्षा आड दिले जातात, गत वर्षीचा  घोषित केलेला  व करोनामुळे  वितरित न झालेला  गोदावरी गौरव पुरस्कार देखिल   तात्या साहेबा यांच्या  जयंती दिली अर्थात  27 फेब्रुवारी ला  देण्यात  येणार आहेत अशी माहिती  कार्यवाह  मकरंद हिंगणे यांनी दिली.
Tag-Kusumagraj-pratishthan-jansthan-puruskar-madhu-mangesh-karnik
ML/KA/DSR/11 JANUARY 2021