उत्तर प्रदेशात किन्नरांच्या संख्येत दर वर्षी 3000ची वाढ

उत्तर प्रदेश, दि. 12 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): किन्नर समाजाबद्दल लोकांमध्ये नेहमीच कुतूहल राहिलं आहे. पण अलीकडच्या काळात त्यांच्याबद्दलच्या लोकांच्या मतामध्ये सकारात्मक बदल दिसू लागला आहे. त्यांच्या वास्तविक परिस्थितीबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केल्यास त्यांच्या जगण्यातील नवीन गोष्टी आपल्याला लक्ष्यात येतील.

शहरातील एका खासगी सामाजिक संस्थेने केलेल्या पाहणीत किन्नरांविषयी अनेक महत्त्वपूर्ण माहिती समोर आल्या आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यात दरवर्षी किन्नरांची संख्या 3 हजाराने वाढत आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्यात 137465 किन्नर होते आणि आता त्यांची संख्या 164615 झाली आहे. म्हणजेच 10 वर्षात त्यांच्या संख्येत 27150 ची वाढ झाली आहे.

आगरा विभागात सर्वात जास्ती किन्नर

सर्वेक्षणानुसार आगरा विभाग सर्वात जास्ती म्हणजे 14915 किन्नर आहेत. बनारस विभागात 12620, मुरदाबाद विभागात 9790, तर प्रयागराज विभागात 8808 किन्नर आहेत. हे आकडे राज्यातील 20 जिल्ह्यामधील 293 किन्नरांकडून मिळाले असून हा सर्वेक्षण अहवाल अबुल कलाम जन सेवा संस्थानचे सचिव नजीब अन्सारी आणि नवी दिल्लीतील इंडो ग्लोबल सोशल सोसायटीने तयार केला आहे.

राज्यात सर्वात जास्ती किन्नर हिंदू धर्मात

प्राप्त माहितीनुसार 74 टक्के किन्नर हिंदू धर्माचे असून, 25 टक्के मुसलमान तर 1 टक्का शीख असल्याचे कळले आहे. 27 टक्के किन्नर पहिली ते नववी शिकले आहेत, 4 टक्के 10वी पर्यंत, 3 टक्के 12वी तर फक्त 2 टक्के स्नातक झालेत. घर सोडलेल्यामध्ये 29 टक्के किन्नरांनी 3-10 या वयात, 40 टक्क्यांनी 11-14 वयात तर 30 टक्क्यांनी 16-22 या वयात घर सोडले.

किन्नरांची परिस्थितीत सुधारण्यासाठी अबुल कलाम जन सेवा संस्थानचे सचिव नजीब अन्सारी आणि नवी दिल्लीतील इंडो ग्लोबल सोशल सोसायटीने किन्नर वेल्फेअर बोर्ड स्थापन करण्याची मागणी केली आहे.

 

Tag- Kinner-increased-every-year-in-UP

DSR/KA/DSR/ 12 JANUARY 2021