जम्मु काश्मिरमध्ये यावर्षी आतापर्यंत 86 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मु काश्मिरमध्ये यावर्षी 86 दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) गेल्या सहा आठवड्यांत दहशतवादी कारवायांमध्ये (Terrorist Activity) वेगाने वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे. इतकेच नव्हे तर सुरक्षा दलांवरील पाकिस्तानी दहशतवाद्यांचे हल्लेही वाढले आहेत. यावर्षी आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 86 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे आणि त्यातील 36 म्हणजेच सुमारे 45 टक्के जून-जुलैमध्ये झालेल्या चकमकींमध्ये ठार झाले आहेत.

जुलै महिन्यात सर्वाधिक दहशतवादी कारवाया (Terrorist Activity) झाल्या आहेत. एका वृत्तानुसार, केवळ जुलै महिन्यातच 20 दिवसांत 10 चकमकी झाल्या आहेत, ज्यात एकूण 20 दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. या 20 दहशतवाद्यांपैकी चार दहशतवादी पाकिस्तानचे होते.

निम्मे दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित
Half of the terrorists belong to Lashkar-e-Taiba

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) यावर्षी सुरक्षा दलांनी एकूण 36 मोहिमा केल्या आणि त्यात 86 दहशतवाद्यांचा (Terrorist) खात्मा केला. त्यापैकी 80 काश्मीरमध्ये आणि 6 जम्मूमध्ये मारले गेले. ठार झालेल्यांपैकी निम्मे दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी (Lashkar-e-Taiba) संबंधित होते. या लष्करी कारवाईत सुरक्षा दलाचे 15 जवानही शहीद झाले आहेत, तर 19 नागरिकांनीही आपला जीव गमावला आहे. ही परिस्थिती यावर्षी 25 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओच्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी करुन युद्धबंदीचा आदर करण्याची घोषणा केल्यानंतरची आहे. पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन सुरूच आहे.

चार वेळा घुसखोरीचे प्रयत्न
Four intrusion attempts

बातमीनुसार, गेल्या आठवड्यात पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) चार वेळा घुसखोरीचे प्रयत्न करण्यात आले. त्यापैकी एक हाणून पाडण्यात आला तर तीन यशस्वी झाले. आतापर्यंत सुमारे 20 दहशतवाद्यांचा (Terrorsts) काश्मीरमध्ये प्रवेश झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर यावर्षी 15 जुलैपर्यंत दहशतवादी संघटनांमध्ये 69 दहशतवादी सामील झाले आहेत. मात्र, गेल्या वर्षी याच काळात 85 लोक दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले होते. दहशतवादी संघटनांमध्ये सामील होणारे बहुसंख्य काश्मीरमधील कुलगाम, शोपियां आणि पुलवामा जिल्ह्यातील आहेत. 2020 मध्ये एकूण 174 दहशतवादी बनले होते, तर 2019 मध्ये ही संख्या 143 होती.

गुप्तचर अहवालांनुसार खोर्‍यात सध्या 200 हून अधिक दहशतवादी सक्रिय आहेत आणि त्यातील 40 टक्के पाकिस्तानातून काश्मीरमध्ये शिरले आहेत.

The last six weeks in Jammu and Kashmir have seen a sharp rise in terrorist activities. Not only that, but Pakistani terrorist attacks on security forces have also increased. So far this year, a total of 86 militants have been killed in Jammu and Kashmir, of which 36, or about 45 per cent, have been killed in clashes in June-July.

PL/KA/PL/22 JULY 2021