हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात आकाराला येत आहे एक नवीन युती

हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात आकाराला येत आहे एक नवीन युती

नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चीनला (China) आव्हान देण्यासाठी हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात (Indo-Pacific region) एक नवीन युती आकाराला येत आहे. दोन्ही महासागरांमध्ये मुक्त आणि नियमानुसार ये जा करण्यासाठी भारत, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात, तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक बैठक घेतली आहे आणि संयुक्त निवेदनही जारी केले आहे. नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

तिन्ही देशांचे कार्यकारी दल
working group of the three countries

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन वेस ली ड्रायन आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री मॉरिस पायने यांनी लंडनमध्ये झालेल्या चर्चेनंतर या तिन्ही देशांचे कार्यकारी दल तयार करण्यास सहमती दर्शविली आहे. तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रात (Indo-Pacific region) नियमांनुसार सागरी आणि अवकाश वाहतूकीवर भर दिला. तसेच या क्षेत्रात लोकशाही आणि सार्वभौम विचारसरणीचा आदर करण्याचीही गरज व्यक्त केली.

छोट्या देशांच्या सागरी क्षेत्रांवर चीनचा कब्जा
China Captures the marine areas of small countries

या संदर्भात, अग्नेय आशियाई देशांची संघटना आसियानला (ASEAN) पाठिंबा देण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. उल्लेखनीय आहे की चीन (China) याच क्षेत्रातील दक्षिण चीन समुद्राच्या मोठ्या भागावर कब्जा करुन त्याला आपला प्रदेश सांगत आहे. त्याने या क्षेत्रातील छोट्या देशांच्या सागरी क्षेत्रांवर कब्जा केला आहे आणि त्यांना वेळोवेळी धमकावत आहे. म्हणूनच, रशिया वगळता जगातील सर्व प्रमुख देश गेल्या अनेक वर्षांपासून हिंद-प्रशांत क्षेत्रात (Indo-Pacific region) मुक्त आणि नियमानुसार वाहतूकीची आवश्यकता व्यक्त करत आहेत, परंतु चीनची मनमानी कमी होत नाही.

भारताला सहकार्य करण्याचे आश्वासन
Promise to cooperate with India

कोव्हिड-19 मुळे (covid-19) जगासमोर उभे असलेले आव्हान पेलण्यासाठी परस्पर सहकार्य बळकट करण्यावरही तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भर दिला. दोन्ही देशांनी कोरोना (corona) संसर्गापासून बचाव करणारी लस (corona vaccine) जगभरातील देशांना पुरवण्याच्या भारताच्या निर्णयाचे कौतुक केले. फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या गरीब देशांना लस देण्याच्या कोव्हॅक्स (Covax) कार्यक्रमा अंतर्गतही पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय, तीन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी परस्पर हितसंबंधांचे संरक्षण, व्यापार आणि पर्यावरण या मुद्द्यांवर देखील चर्चा केली.

A new alliance is being formed in the Indo-Pacific region to challenge China. India, France and Australia have decided to work together to move freely and regularly in both the oceans. In this regard, the Foreign Ministers of the three countries have convened a meeting and issued a joint statement. This information has been given by the Ministry of External Affairs in New Delhi.

 

PL/KA/PL/7 MAY 2021