चीनमुळे अमेरिका भारताशी संबंध वाढवेल : सीआरएस अहवाल

चीनमुळे अमेरिका भारताशी संबंध वाढवेल

वॉशिंग्टन, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिकेच्या (US) संसदेच्या (कॉंग्रेस) एका अहवालानुसार (CRS Report) बायडेन प्रशासन भारताशी (India) द्विपक्षीय भागीदारीचा विस्तार सुरु ठेवू शकतो. यामागील कारण म्हणजे क्षेत्रामध्ये चीनच्या वाढत्या आर्थिक आणि लष्करी सामर्थ्याविषयी चिंता हे आहे. या अहवालानुसार असा अंदाज वर्तवला जात आहे की प्रशासन भारतातील मानवाधिकारांकडे अधिक लक्ष देईल परंतु चीनच्या तुलनेत संतुलन राखण्याच्या गरजेमुळे व्यापक धोरणात बदल होण्याची शक्यता नाही.

बायडेन प्रशासनासाठी भारत-अमेरिका संबंध महत्त्वाचे
Indo-US relations are important for the Biden administration

कॉंग्रेशनल रिसर्च सर्व्हिसने (सीआरएस) जाहीर केलेल्या भारत(India)-अमेरिका (US) संबंधांवरील ताज्या अहवालानुसार (CRS Report), बायडेन प्रशासनासाठी भारत-अमेरिका संबंध महत्त्वाचे आहेत. हा अहवाल ऍलन क्रोनस्टॅट यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आशियाच्या अनेक तज्ञांनी तयार केला आहे.

बहुपक्षीय व्यासपिठांवर भारताशी सहकार्य महत्वाचे
Cooperation with India on multilateral platform is important

त्यात सांगण्यात आले आहे की, अनेक विश्लेषक विशेष करुन क्वाड उपक्रमाबाबत भारताला असलेली कळकळ पाहून अमेरिकेकडून (US) बहुपक्षीय व्यासपिठांवर भारताशी (India) सहकार्य महत्वाचे असल्याचे सांगतात आणि ते बायडेन प्रशासन आपल्या परराष्ट्र धोरणात हिंद-प्रशांत क्षेत्राला प्राथमिकता देण्यासाठी कोणत्या मर्यादेपर्यंत वचनबद्धता व्यक्त करते हे पहाण्यास उत्सूक आहेत.

According to a report in the US Congress, the Biden administration may continue to expand its bilateral partnership with India. The reason behind this is the concern about China’s growing economic and military power in the region. According to the report, the administration is expected to pay more attention to human rights in India, but the need to maintain a balance compared to China is unlikely to lead to a comprehensive policy change.

PL/KA/PL/22 JULY 2021