भारत लवकरच खरेदी करु शकेल मिग -29 लढाऊ विमाने

भारत खरेदी करु शकेल मिग -29 लढाऊ विमाने

नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत (India) लवकरच रशियाकडून (Russia) 21 मिग -29 (Mig-29) लढाऊ विमाने खरेदी करू शकेल. रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी टेक्निकल को-ऑपरेशनच्या प्रवक्त्याने मंगळवारी माहिती दिली आहे की रशियाकडून 21 मिग -29 लढाऊ विमानांच्या पुरवठ्याबाबत भारताला एक व्यावसायिक प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

प्रवक्त्याने सांगितले, ‘भारतीय हवाई दलाला 2021 मध्ये 21 मिग -29 (Mig-29) लढाऊ विमानांच्या पुरवठ्यासाठी निविदा अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याचा व्यावसायिक प्रस्तावही रशियाकडून (Russia) देण्यात आला आहे. आता त्यावर ग्राहकाने म्हणजेच भारताने (India) विचार करायचा आहे.

भारतीय संरक्षण खरेदी परिषदेकडून विमाने खरेदी प्रस्तावाला मान्यता
Approval of aircraft procurement proposal from Defense Purches Council of India

गेल्या वर्षी, भारतीय संरक्षण खरेदी परिषदेने रशियाकडून 21 मिग -29 (Mig-29) लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. भारत सरकार ही विमाने खरेदी करण्यास इच्छूक आहे, असे रशियानेही फेब्रुवारीमध्ये म्हटले होते. मॉस्को येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय एरोस्पेस शोमध्ये हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा शो 25 जुलैपर्यंत चालणार आहे. भारत (India) रशियाकडून (Russia) 21 नवीन मिग -29 विमाने खरेदी करुन आपल्या लढाऊ विमानांची आवश्यकता पूर्ण करु इच्छित आहे. भारतीय वायुसेनेकडे मिग-29 विमानांच्या तीन तुकड्या आहेत.

शत्रूच्या रडारच्या टप्प्यात न येण्याची क्षमता
Ability to not get into enemy radar phase

दुसरीकडे, रशियन विमान निर्मात्याने मंगळवारी आपल्या नवीन लढाऊ विमानांचा प्रारंभिक नमुना सादर केला, जो स्टील्थ (शत्रूच्या रडारच्या टप्प्यात न येण्याची) क्षमता आणि इतर अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. मॉस्कोबाहेरील झुकोव्हस्की येथील एमएकेएस -2021 इंटरनेशनल एविएशन अँड स्पेस सलून येथे प्रदर्शनातील संभाव्य लढाऊ विमानाचे निरिक्षण करण्यात आले. नवे डिझाईन विमान निर्माता सुखोई यांनी एलटीएस (हलक्या विमानांसाठीचे रशियन नाव) कार्यक्रमांतर्गत तयार केले आहे. उत्पादकांनी सांगितले की प्रारंभिक विमान आपले पहिले उड्डाण 2023 मध्ये करण्यासाठी तयार आहे आणि 2026 पर्यंत त्याचा पुरवठा सुरू होऊ शकेल. त्यांनी सांगितले की नवीन डिझाइन पायलट रहित किंवा दोन आसनी प्रकारात बदलता येऊ शकेल.

 

India may soon buy 21 MiG-29 fighter jets from Russia. A spokesman for Russia’s Federal Service for Military Technical Co-operation said on Tuesday that Russia had submitted a commercial proposal to India for the supply of 21 MiG-29 fighter jets. The spokesperson said, ‘The Indian Air Force has received tender applications for the supply of 21 MiG-29 fighter jets in 2021. His business proposal has also been submitted by Russia. Now it is up to the consumer, India.

PL/KA/PL/21 JULY 2021