भारतात तयार झालेल्या कोरोना लसीला जगभरातून मागणी, आतापर्यंत 50 देशांना पुरवठा

भारतात तयार झालेल्या कोरोना लसीला जगभरातून मागणी, आतापर्यंत 50 देशांना पुरवठा

नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतात तयार झालेल्या (Made in India) कोरोना लसीला (Corona Vaccine) जगभरात मोठी मागणी आहे आणि भारतही जगातील अनेक देशांना वेगाने लस उपलब्ध करुन देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की भारताने आतापर्यंत जगातील जवळपास 50 देशांना भारतात बनलेली (Made in India) लस पुरवली आहे. पंतप्रधान मोदींनी स्विडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांच्याशी झालेल्या आभासी चर्चेदरम्यान ही माहिती दिली.

भारताने आपल्या बहुतांश शेजारी देशांना लस पुरवली आहे, त्यानंतर अनेक आफ्रिकन देशांमध्ये ही लस (Corona Vaccine) पाठवण्यात आली आहे. युरोपमधील अनेक देशांमध्येही भारतीय (Made in India) लस पोहोचली आहे आणि काही दक्षिण अमेरिकन देशांमध्येही भारतीय लस पुरवण्यात आली आहे. जगभरात भारतीय लसीची मागणी वेगाने वाढत आहे. अलिकडेच, कॅनडा, लेसोथो, कोंगो, रवांडा, केनिया, ग्वाटेमाला, कंबोडिया, नायजेरिया, लुआंडा, एंडीगुआ, बार्बुडा आणि सुरिनाम यासारख्या देशांमध्ये भारतीय (Made in India) लस पोहोचली आहे.

देशातही जेव्हापासून पंतप्रधान मोदींनी लस घेतली आहे, लसीकरण कार्यक्रमाला गती आली आहे, आता देशात दररोज दहा लाखाहून अधिक लोकांचे लसीकरण होत आहे. भारतात आतापर्यंत 1.80 कोटींहून अधिक लोकांना कोरोना लस (Corona Vaccine) देण्यात आली आहे आणि गुरुवारी 13 लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आली.

PL/KA/PL/6 MAR 2021