भारतातील 58 लाखाहून अधिक लोकांचे कोरोना लसीकरण

भारतातील 58 लाखाहून अधिक लोकांचे कोरोना लसीकरण,Corona Vaccination

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात आतापर्यंत 58 लाखाहून अधिक लोकांना कोविड-19 लस (Corona Vaccination Update) देण्यात आली आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (health Ministery) रविवारी सांगितले. मंत्रालयाने म्हटले आहे की सर्वाज जास्त लसीकरणाच्या बाबतीत भारत आता अमेरिका आणि ब्रिटन नंतर तिसर्‍या क्रमांकावर आहे. मंत्रालयाने सांगितले की रविवारी आसाम, बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, मणिपूर, ओडिशा, राजस्थान, त्रिपुरा आणि उत्तराखंड या 12 राज्यात लसीकरण सत्र आयोजित करण्यात आली होती.

एका तात्पुरत्या अहवालात सांगण्यात आले आहे की रविवारी संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांपर्यंत 58,03,617 लोकांचे कोरोना लसीकरण (Corona Vaccination) करण्यात आले आहे. आतापर्यंत 1,16,478 सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे आणि रविवारी 6 वाजून 40 मिनिटांपर्यंत 1,295 सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

मंत्रालयाने म्हटले आहे की आतापर्यंत 53,17,760 आरोग्य कर्मचार्‍यांना आणि कोविड-19 च्या विरोधात आघाडीवर काम करत असलेल्या 4,85,857 लोकांना कोरोना लस (Corona Vaccination) देण्यात आली आहे.

PL/KA/PL/8 FEB 2021