
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ‘न्युज डंका’ या वेब न्यूज चॅनलचे उद्घाटन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर देखील उपस्थित होते. पत्रकारीता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो, त्यामुळे राष्ट्रवादाचा आवाज बुलंद करण्यासाठी सुरू करण्यात आलेले हे चॅनल नक्कीच महत्त्वाची भुमिका बजावेल, अशा शुभेच्छा फडणवीस यांनी दिल्या. याप्रसंगी चॅनलचे सल्लागार संपादक आणि आमदार अतुल भातखळकर, माजी आमदार कृपाशंकर सिंह, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे सी ई ओ आशिष चौहान, संपादक दिनेश कानजी, प्रमुख मार्गदर्शक प्रशांत कारूळकर आणि संजय ढवळीकर उपस्थित होते.
Tag- Inauguration-of-‘News Danka’-by-Devendra-Fadnavis
KA/DSR/13 JANUARY 2021