हायपरलूपने मुंबई-पुणे प्रवास होणार अवघ्या २५ मिनिटांत

 हायपरलूपने मुंबई-पुणे प्रवास होणार अवघ्या २५ मिनिटांत

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लवकरच भारतात हायपरलूप ट्रेन सुरु होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ शेअर केला आहे. ही ट्रेन 1200 च्या स्पीडने धावणार आहे. रेल्वे प्रवास अधिक गतीमान करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहे. लवकरच बुलेट ट्रेन धावणार आहे. यानंतर आत लवकरच हायपरलूप ट्रेनमधून विमानापेक्षा सुपफास्ट प्रवास करता येणार आहे. हायपरलूप ट्रेन ही एक हाय स्पीड ट्रेन आहे. ट्यूब व्हॅक्यूममध्ये ही ट्रेन धावते. चुंबकीय तंत्रज्ञानाने सुसज्ज पॉडवर ही ट्रेन धावते. पारदर्शक ट्यूबमधून ही ट्रेन धावते. ट्यूबमध्ये घर्षण नसल्यामुळे हायपरलूप ट्रेन वेग ताशी 1100 ते 1200 किमी इतका असतो.

हायपरलूप ट्रेनच्या चाचणीसाठी भारतात 410 किमीचा ट्रॅक तयार झाला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. रेल्वे आणि आयआयटी मद्रास यांनी मिळून हा ट्रॅक तयार केला आहे. हायपरलूप ट्रेन प्रणालीमुळे भारतात वाहतुकीचा हाय-स्पीड मार्ग खुला होणार आहे अशी पोस्ट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ शेअर करताना लिहीली आहे.

2019 मध्ये मुख्यमंत्रीपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी कर्जिन हायपूरलूप कंपनीच्या अमेरिकेतील चाचणी केंद्राला भेट दिली होती. मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता.

भारतातील पहिली हायपरलूप ट्रेन मुंबई ते पुणे दरम्यान धावणार असल्याची चर्चा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे हे अंतर केवळ 25 मिनिटांत पार करता येणार आहे. सध्या हे अंतर कापण्यासाठी रेल्वेला 3 ते 4 तास लागतात. हा विनाथांबा सुसाट प्रवास असेल. हायपूरलूप ट्रेनच्या या पॉडमध्ये एकावेळी 24-28 लोक बसू शकतील

SL/ML/SL

6 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *