ही गोळी करणार पाणी जीवाणूमुक्त

ही गोळी करणार पाणी जीवाणूमुक्त

वॉशिंग्टन, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जगभरात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक विशेष प्रकारची हायड्रोजेल गोळी (Hydrogel Tablet) तयार केली आहे. या गोळीमुळे नद्या आणि तलावांचे पाणी एका तासात पिण्यायोग्य होईल. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की ही गोळी पाणी 99.9 टक्के जीवाणूमुक्त (Bacteria free Water) करते.

अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ही हायड्रोजेल गोळी (Hydrogel Tablet) तयार केली आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे की साधारणपणे पाणी जीवाणूमुक्त (Bacteria free Water) करण्यासाठी ते उकळून प्यायले जाते. यात वेळ आणि ऊर्जा दोन्ही खर्च होते, परंतु नवीन हायड्रोजेल गोळीने पाणी पिण्यायोग्य बनवणे सोपे आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, ही हायड्रोजेल गोळी (Hydrogel Tablet) नदी किंवा तलावाच्या पाण्याने भरलेल्या भांड्यात टाकावी लागेल. गोळी टाकल्यानंतर एक तासाने पाणी 99.9 टक्के जीवाणू मुक्त (Bacteria free Water) होईल. एका तासानंतर, ही गोळी पाण्याबाहेर काढता येते. पाण्यात कोणतेही रसायन असणार नाही.

संशोधकांचे म्हणणे आहे की पाण्यात टाकल्यानंतर ही गोळी हायड्रोजन पेरॉक्साइड तयार करते. जे कार्बन कणात मिसळून जीवाणूंचा नाश करते. या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की यामुळे पाण्यामध्ये कोणतेही रासायनिक किंवा उप-उत्पादन तयार होत नाही जे मानवाला हानी पोहोचवू शकते.

संशोधक गुईहुआ यू यांचे म्हणणे आहे की, जगभरात स्वच्छ पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी हायड्रोजेल गोळी (Hydrogel Tablet) एक गेम चेंजर म्हणून सिद्ध होईल. ती एक मोठा बदल घडवून आणेल कारण तीचा वापर करणे सर्वात सोपे आहे.

संशोधकांच्या पथकाचे म्हणणे आहे की लोकांना हायड्रोजेल गोळी उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरु आहे. या व्यतिरिक्त, ती अधिक चांगली बनवून विविध प्रकारच्या जीवाणूंसह विषाणूही नष्ट कसे करता येतील याचाही शोध सुरु आहे.

There is an acute shortage of clean drinking water worldwide. In such cases, American scientists have developed a special type of Hydrogel Tablet. This pill will make the water of rivers and lakes drinkable in an hour. Scientists claim that this pill will make 99.9 percent of water Bacteria Free. Work is underway to make the hydrogel pill available to the public.

PL/KA/PL/13 OCT 2021