तुमचा बनारसचा अनुभव कसा होता? : यूपी टूरिझम

तुमचा बनारसचा अनुभव कसा होता?

वाराणसी, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बनारसच्या प्रत्येक क्षणात उत्साह आहे, येथे आल्यामुळे पहाटे आणि संध्याकाळमधील फरकदेखील नाहीसा होतो. काहींना घाटांवर अध्यात्म सापडतो तुमचा बनारसचा अनुभव कसा होता?

देशातील कोरोना संक्रमण काळात राज्याच्या पर्यटनाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. त्यामुळे यूपी टूरिझमकडून राज्यात पुन्हा पर्यटनाला रुळावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. मागील महिन्यात, यूपी टूरिझम, पर्यटकां साठी आगामी पर्यटन हंगामाची  नवीन माहिती सामायिक करून, पूर्वांचलच्या वाराणसी आणि आसपासच्या जिल्ह्यांविषयी पोस्टर जारी करून पर्यटन स्थळांचे ब्रँडिंग करीत आहे. या भागात गुरुवारी सायंकाळी यूपी टूरिझमने सुभा-ए-बनारस आणि शाम-ए-बनारस ही थीम शेअर करणारे एक पोस्टर जारी केले असून यात पर्यटकांना त्यांचे अनुभव विचारत आहे.

How was your experience in Benares?

ML/KA/PGB

22 July 2021