मुसळधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाचे सर्व 13 दरवाजे उघडले

अमरावती, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या अप्पर वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रा मध्ये मुसळधार पाऊस सूरू असून प्रकल्पाच्या पाणी पातळीत Water level मोठया प्रमाणांत वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारी या धरणाचे सर्वच्या सर्व 13 दरवाजे 50 सेमी नी ऊघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून 1053 घमी प्रतीसेकंद विसर्ग सुरू आहे.

अप्पर वर्धा धरणाची पाणी साठवण क्षमता 342.50 मिटर असून आज पर्यंत ती 342.48 मिटर एवढी झाली आहे.सध्या अप्पर वर्धा धरण Upper Wardha Dam शंभर टक्के पूर्णत्वास जात असल्याचे पाहून धरणाचे तेराही गेट उघडण्यात आले आहेत.

प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. due Heavy rains opened all 13 gates of the Upper Wardha Dam

ML/KA/PGB

23 Sep 2021