गोसेखुर्द धरण रंगले तिरंग्याच्या रंगात

भंडारा, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विदर्भातील सर्वात मोठे गोसे धरण आज तिरंग्याच्या रंगातून रंगलेला दिसले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शेवट ही भक्तिमय व्हावा यासाठी गोसे धरणाच्या अधिकाऱ्यांनी केसरी, पांढरा आणि या हिरव्या रंगांचे दिवे लावून संपूर्ण धरण हा तिरंग्याच्या रंगात रंगविले आहे. अथांग पाण्याचा साठा असलेल्या या धरणावर हा रंग अधिकच उठून दिसत होता. हे दृश्य खऱ्या अर्थाने आकर्षित करणारे देशाप्रती अभिमान बाळगणारे विलोभनीय दृश्य आहे. काळोख अंधारामध्ये धरणावरील हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकही मोठ्या प्रमाणात उत्साही दिसले. Gosekhurd dam painted in tricolor
ML/KA/PGB
15 Aug 2023