मुंबईत मालवणी इथे 58 किलो गांजा जप्त

मुंबई दि .२३( एमएमसी न्युज नेटवर्क): मुंबई गुन्हे शाखेतर्फे गांजा तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान तब्बल ५८ .२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांज्याची किंमत १४ लाख ५५ हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
मालाड ,मालवणी ( पश्चिम ) येथील प्लॉट क्रमांक ४२ , गेट क्रमांक ७ येथे अफसर सय्यद नावाचा एक इसम गंजा विकत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखा कक्ष-९ च्या पथकाला मिळालीहोती. त्यावरून पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी अफसर अन्वर हुसेन सय्यद (३८) याला ताब्यात घेतले .यावेळी त्याच्या कडून ५८.२ किलो गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात अफसर अन्वर हुसेन सय्यद याच्या ऍक्टविरुद्ध एनडीपीएस अर्थात अंमली पदार्थ विषयक कायद्यान्तर्गत गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे .

 

tags- ganja-malvani-mumbai-crimebranch

SW/KA/DSR/23 JANUARY 2021