वन्यजिव प्राण्याची कातडी व पंज्याची तस्करी करणाऱ्या चौकडीला अटक

वन्यजिव प्राण्याची कातडी व पंज्याची तस्करी करणाऱ्या चौकडीला अटक

मुंबई, दि.21(एमएमसी न्यूज नेटवर्क) :  “ पट्टेरी वाघ ” या राष्ट्रीय वन्यजिव प्राण्याची कातडी व पंज्याची तस्करी करणाऱ्या चौकडीला कोनगाव पोलीसांनी अटक केली. प्रशांत सुशिलकुमार सिंग (२१ ), चेतन मंजे गौडा (२३ ), आर्यन मिलींद कदम ( २३) व अनिकेत अच्युत कदम ( २५ ) अशी अटक करण्यात आलेल्या या तरुणाची नावे असून ते सर्व मुंबई, वडाळा येथील रहिवासी आहेत.(Four arrested for smuggling wildlife skins and paws)

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील नाशिक – मुंबई बायपास हायवे रोड , यासूरी हॉटेलचे समोर , ठाकुरपाडा , येथे काही तरुण त्यांच्याकडे असलेले “ पटटेरी वाघ ” या वन्यजिव प्राण्याचे कातडे व पंजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर कोनगाव
पोलिसांना मिळाली होती .त्यानुसार कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील , तपास पथकातील अंमलदार व वन विभागाचे कर्मचारी व वॉर रेस्क्यु फाऊन्डेशन चे वन्यजिव अभ्यासक सुहास पवार व योगेश कांबळे यांचेसह त्या ठिकाणी सापळा रचुन चार तरुणांना ताब्यात घेतले . (Four arrested for smuggling wildlife skins and paws) त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडुन अनमोल किंमतीचे ” पट्टेरी वाघ ” या राष्ट्रीय वन्यजिव प्राण्याचे सोलुन काढलेले , कडक व सुकलेले काळया व पिवळया पट्टे (लांबी ४९ इंच , रुंदी २४ इंच ) असलेले कातडे व “ पट्टेरी वाघाचे पाच नखे सलेला पंजा हस्तगत करण्यात आले आहे.

या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात या चौघांविरुद्ध वन्यजिव संरक्षण कायदा १९ ७२ चे कलम ९ , ३९ ( ३ ) , ४४ , ४८ ( अ ) , ४९ ( बी ) , ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करून प्रशांत सुशिलकुमार सिंग , चेतन मंजे गौडा , आर्यन मिलींद कदम ( रा .वडाळा भक्तीपार्क)
व अनिकेत अच्युत कदम ( सायन प्रतिक्षा नगर) या चौकडीला अटक करण्यात आली आहे . गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील हे करीत आहेत .(Four arrested for smuggling wildlife skins and paws)

SW/KA/PGB
21 april 2021