राज्यातील महापुरात169 मृत्यू तर कोट्यवधींचे नुकसान : विजय वडेट्टीवार

नागपूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात महापुरात 169 अधिकृत मृत्यू असून 1 जण बेपत्ता आहे, 55 जण जखमी आहे.केवळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र नाही तर अमरावती, अकोला, चंद्रपूरच्या Chandrapur काही भागांमध्ये, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार Vijay Vadettiwar यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली .

रस्त्यांचे नुकसान साधारण आठशे कोटी रुपये आहे, विद्युत विभागाचे चारशे कोटींपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे अजून सर्व ठिकाणी पंचनामे व्हायचे आहे, सर्वांना पंचनामे करायला निर्देशित केले आहे… चिपळूण, महाड, खेड, सांगली, सातारा, कोल्हापूर Chiplun, Mahad, Khed, Sangli, Satara, Kolhapur या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे…

या सगळ्यांचा पूर्ण पंचनामा Panchnama आल्याशिवाय , एकूण आकडा आल्याशिवाय आपण मदतीचा निर्णय घ्यायचा नाही अशी चर्चा काल झाली आणि तातडीनं दहा हजार रुपये, सोबत काही धान्य बाधित कुटुंबाना लगेच मदत करीत आहोत.. किमान साठ-सत्तर हजार तरी कुटुंबाना ही मदत केली जाईल, कुटुंब संख्या वाढू शकते असे वडेट्टीवार Vijay Vadettiwar  म्हणाले 10 हजाराची मदत बँकेमार्फत खात्यात करू असे त्यांनी स्पष्ट केले.

महाड, चिपळूण Mahad, Chiplun सारख्या शहरांमध्ये तर सर्व कार्यालय ग्रामपंचायत, नगर परिषद पंचायत मध्ये पाणी गेले आहे त्यामुळे सगळे रेकॉर्ड मिळत नाही, त्यामुळे फोटो काढा आणि फोटोलाच ग्राह्य धरून लोकांना मदत करावी लागेल… इन्शुरन्स कंपन्या सुद्धा आम्ही ते सांगितलं आहे असेही ते म्हणाले.

पुढील आठ दिवसांमध्ये सर्व पंचनामे आणि सर्व माहिती शासनाकडे गोळा होईल, तातडीने सगळं करा आणि प्रस्ताव पाठवा म्हणून आम्ही प्रशासनाला सूचना दिल्यात…मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील आपत्ती बद्दल केंद्र सरकार कडे 3 हजार 700 कोटी 3 thousand 700 crore मागितले होते, मात्र मिळाले फक्त 700 कोटी रुपये… त्यासाठी केंद्राचे धन्यवाद, मात्र आता महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा दौरा करावा आणि गुजरातच्या धर्तीवर तातडीने मदत करावी अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

कोकणात आणि राज्यात इतरत्र व्यापाऱ्यांना कमी व्याजावर कर्ज द्यावे लागणार आहे Merchants will have to lend at lower interest rates , जिल्हा व सहकारी बँका सक्षम असतील त्यांनी तो निर्णय घ्यावा. उपमुख्यमंत्री Deputy Chief Minister आणि सहकारमंत्री यांना त्याबद्दल विनंती आहे, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात या बँकांची स्थिती भक्कम आहे आणि अशा स्थितीमध्ये व्यापाऱ्यांना एक – दोन टक्के दराने कर्ज द्यावे अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कोरोना निर्बंधा बद्दल आज मुख्यमंत्री टास्क फोर्सची CM Task Force बैठक घेत आहेत. त्या बैठकीत कोरोना पॅाझीटीव्हीटी दर कमी असलेल्या जिल्ह्यातील निर्बंध हटवण्याबाबत निर्णय घेणार, आज घोषणा करण्याची शक्यता आहे…आजच्या टास्क फोर्स बैठकीत मुंबई लोकलबाबत निर्णय घेणार आहोत असे सांगत वडेट्टीवार म्हणाले की काही जिल्ह्यात कोरोना वाढत आहेत, काही ठिकाणी कमी झालेय. काही जिल्ह्यात कोरोना संपलाय… तिसऱ्या लाटेचा विचार करुन निर्बंध हटवण्यावर चर्चा केली जाईल. पुरामुळे कोकणापेक्षा नांदेड परिसरात शेतीचं जास्त नुकसान झाले आहे , गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना ही मदत करणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले . Floods in the state have claimed 169 lives and caused crores of rupees: Vijay Vadettiwar

ML/KA/PGB

29 July 2021