दीक्षाभूमीवरील “धम्म ध्वजाचे ध्वजारोहण “

नागपूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागभूमीत असलेल्या पवित्र दीक्षाभूमीवर 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने बौद्ध धम्माचे प्रतिक असलेल्या पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण स्मारक समितीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई arya nagarjun surai ssai यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळेला स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले , विलास गजघाटे, नामदेव सुटे , समितीचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे निवडक पदाधिकारी, दीक्षाभूमी परिवारांतील प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थिती होती.

यावेळी पंचशील ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर उपास्थितांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, बुद्धवंदना तसेच कोरोनाकाळात in COVID pandemic काही लोकांचे मृत्यू झाला त्यामुळे त्याना श्रद्धांजली वाहण्यात आली.

ML/KA/PGB

 

14 Oct 2021