#शेतकरी चळवळीला पाठिंबा देणारा खेळाडू मोंटी पनेसरचा कृषी कायद्यास विरोध

पंजाब, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंजाबमधील शेतकरी शेतीविषयक कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या या चळवळीला पंजाबी गायक आणि कलाकारांनीही पाठिंबा दर्शविला आहे. त्याच वेळी आता खेळाडूंनीही या चळवळीत शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मोंटी पनेसर यांनी शेतकरी चळवळीच्या समर्थनार्थ समूह संपर्क माध्यमांवर पोस्ट केले.

माजी फिरकीपटू लिहितो, ‘जर खरेदीदाराने असे म्हटले असेल की कराराची पूर्तता केली जाऊ शकत नाही कारण पिकाचा दर्जा हा सांगितल्याप्रमाणे नाही, अशा प्रकारात शेतकऱ्यांकडे कोणते संरक्षण आहे? किंमत निश्चित करण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय नाही.
पनेसर यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “केंद्राच्या तीन कृषी कायद्यास शेतकरी विरोध करीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की हा कायदा न्यूनतम सुपरपोर्ट प्राइस सिस्टम रद्द करतो आणि त्यांना ‘मोठ्या कॉर्पोरेट्स’च्या दयेवर सोडते.

या कायद्यामुळे व्यापारातील निर्बंध आणि सर्व धान्ये, डाळी, तेलबिया आणि कांद्यावरील किंमतीवरील नियंत्रणे दूर होतात, ज्याचा फायदा फक्त व्यपाऱ्यांना होईल. सरकारने एकतर हे तीन कायदे परत घ्यावेत किंवा नव्या कायद्याच्या माध्यमातून किमान आधारभूत किंमतीची हमी द्यावी अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. म्हणूनच हजारो शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत.

भारताचे माजी बास्केटबॉल खेळाडू अर्जुन पुरस्कार विजेते सज्जनसिंग चीमा, ऑलिम्पियन हॉकीपटू गुरमेलसिंग राय आणि राजबीर कौर राय यांनीही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना आपल्या मागण्या शांततेत प्रदर्शित करायच्या आहेत, परंतु सरकारने त्यांना थांबवणे चुकीचे आहे. शांततेत निदर्शन करणे हा लोकशाही ने दिलेला हक्क आहे.

PGB/KA/HSR/1 DEC 2020
Tag-farmer/bill/March