मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पंढपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दि २० संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेला शिव आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण उपक्रम यापुढेही अखंडितपणे सुरू ठेवा अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांनी आज दिल्या.

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अत्याधुनिक एएलएस रुग्णवाहिकेची  Equipped ambulance चावी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या Dr. Shrikant Shinde Foundation माध्यमातून ही रुग्णवाहिका Equipped ambulance देण्यात आली आहे.

यावेळी श्रीमती रश्मी ठाकरे, Rashmi Thackeray, पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे  Environment and Tourism Minister Aditya Thackeray, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे Sri Vitthal-Rukmini temples समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री विठ्ठल जोशी, समिती सदस्य मा श्री संभाजी राजे शिंदे आदी जण उपस्थित होते.

यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीला एक अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्यात यावी अशी मागणी आम्ही डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडे केली होती. आज आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आमच्या ताब्यात ही रुग्णवाहिका Equipped ambulance मिळत असल्याचा विशेष आनंद होत आहे. सदर रुग्णवाहिका पंढरपूर परिसरातील गरजू रुग्णांना आधार ठरेल असा विश्वास श्री औसेकर महाराज यांनी व्यक्त केला.

यावेळी, खासदार डॉ श्रीकांत शिंदे Shrikant Shinde आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी संयुक्तपणे संपादित केलेल्या वैद्यकीय मदत मार्गदर्शक या ग्रंथाच्या प्रति सर्व मान्यवरांना भेट देण्यात आल्या.

Chief Minister Uddhav Thackeray

ML/KA/PGB

20 July 2021