सणासूदी पूर्वी खाद्यतेलांच्या किंमती …….

Edible Oils Price Will Be Reduced

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सणासुदीच्यापूर्वी खाद्यतेलांच्या किंमती (Edible Oils Price) कमी ठेवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. खाद्यतेलांसाठी साठवण मर्यादा निश्चित केल्यानंतर बुधवारी पाम, सोया आणि सूर्यफूलाच्या कच्च्या तेलावरील मूलभूत सीमाशुल्क (customs duty) देखील कमी करण्यात आले.

खाद्यतेलांच्या किंमती 15 रुपयांपर्यंत कमी होतील
Edible Oils price will come down to Rs 15

याशिवाय सणासुदीच्या काळात पुरवठा सुधारण्यासाठी सप्टेंबरमध्ये विक्रमी आयात करण्यात आली. सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत सरकारने खाद्यतेलांवरील सीमाशुल्क कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे पाम, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या खाद्यतेलांच्या किंमती (Edible Oils Price) 15 रुपयांपर्यंत कमी होतील.

खाद्यतेल संघटना एसईएने सांगितले की सप्टेंबरमध्ये आयात 63 टक्क्यांनी वाढून विक्रमी 16.98 लाख टन झाली. कोणत्याही एका महिन्यातील ही सर्वाधिक आयात आहे, ज्यामध्ये पाम तेलाचा विक्रमी वाटा आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2015 मध्ये खाद्यतेलाची सर्वाधिक आयात 16.51 लाख टन होती.

अखाद्य तेलांची आयातही साडेतीन पटींनी वाढून 63,608 टनावर गेली आहे जी मागील वर्षी 17,702 टन होती. एकूण तेल आयातीत पामतेलाचा वाटाही गेल्या वर्षी 54 टक्क्यांवरून वाढून 63 टक्क्यांवर गेला आहे.

किंमती कमी करण्यासाठी चौथ्यांदा कपात
A fourth cut to lower  price

खाद्यतेलांच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारने गेल्या काही महिन्यांत चौथ्यांदा उत्पादन शुल्क (Excise duty) आणि सीमाशुल्क (customs duty) कमी केले आहे. बुधवारी उपकर आणि सीमा शुल्कात कपात केल्यानंतर, रिफाईंड पाम तेलाच्या किंमती 8 ते 9 रुपयांनी आणि सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या 12 ते 15 रुपयांनी कमी होतील.

एसईएच्या कार्यकारी संचालकांनी सांगितले की साधारणपणे सरकारने आयात शुल्क कमी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय किंमती वाढतात. गेल्या वर्षभरात देशांतर्गत बाजारात खाद्यतेल 46.15 टक्क्यांनी महाग झाले आहे. देशातील एकूण खाद्यतेलाच्या खपापैकी 60 टक्के आयात करावे लागते.

The government is constantly trying to keep the edible oil prices low before the festival. Basic customs duties on palm, soy and sunflower crude oil were also reduced on Wednesday after the storage limit for edible oils was fixed. In addition, record imports were made in September to improve supply during the festive season.

PL/KA/PL/14 OCT 2021