खगोलशास्त्रज्ञांनी शोधला लोखंड वितळवणारा ग्रह

खगोलशास्त्रज्ञांनी शोधला लोखंड वितळवणारा ग्रह

वॉशिंग्टन, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून (Earth) दूर एका ताऱ्याभोवती फिरत असलेल्या ग्रहावर आयोनाईज्ड कॅल्शियम (ionized calcium) शोधून काढले आहे. हा ग्रह इतका उष्ण आहे की त्याठिकाणी लोखंडही लगेच वितळेल. वास्प -76 बी (Wasp-76b) नावाच्या या ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान 2400 अंश सेंटीग्रेडपेक्षाही जास्त होत असते. हे तापमान इतके जास्त आहे की मानवाचे रुपांतर लगेचच वाफेत होईल. या ग्रहावर ताशी 10000 किलोमीटर वेगाने विषारी वायू असलेले वारेही वाहतात.

ग्रहाच्या वातावरणात आयोनाईज्ड कॅल्शियम आढळले
Ionized calcium was found in the planet’s atmosphere

शास्त्रज्ञांनी अलीकडेच वास्प -76 बी (Wasp-76b) ग्रहाच्या वरच्या वातावरणात आयोनाईज्ड कॅल्शियम (ionized calcium) शोधले आहे. विद्युत भारित घटकाची घटकाची ओळख या ग्रहाच्या असाधारण हवामानाची अनेक रहस्ये उलगडू शकते. टोरंटो विद्यापीठातील डॉक्टरेटच्या विद्यार्थिनी आणि प्रमुख लेखक एमिली डिबर्ट यांनी सांगितले की, आम्हाला भरपूर कॅल्शियम दिसत आहे. हा खरोखर एक मोठा शोध आहे.

हा ग्रह पृथ्वीपासून 640 प्रकाश वर्ष दूर आहे
This planet is 640 light years away from Earth

आयोनाईज्ड कॅल्शियच्या (ionized calcium) स्पेक्ट्रल सिग्नेचरद्वारे संकेत मिळू शकतो की या बाह्यग्रहाच्या वरच्या वातावरणातील वारे वेगवान आहेत. यावरुन अशी माहितीही मिळते की या बाह्यग्रहावरील वातावरणाचे तापमान आपण आधी विचार केले त्यापेक्षा बरेच जास्त आहे. हा ग्रह मीन राशीच्या दिशेने पृथ्वीपासून (Earth) 640 प्रकाश वर्ष दूर आहे. पाच वर्षांपूर्वी शोध लागल्यापासून या प्रचंड उष्ण ग्रहाने खगोलशास्त्रज्ञांना भुरळ घातली आहे.

वितळलेल्या लोखंडाचा पाऊस
Rain of molten iron

शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की या ग्रहावर वितळलेल्या लोखंडाचा पाऊस पडतो. या ग्रहा संदर्भात बेलफास्टच्या क्वीन्स विद्यापिठासह एका आंतरराष्ट्रीय चमुने आतापर्यंतची सर्वात सखोल तपासणी केली आहे. त्यांनी हवाईच्या मौना येथे असलेल्या जेमिनी नॉर्थ दूर्बिणीद्वारे डेटाचे विश्लेषण केले आहे. त्या आधारे त्यांनी सांगितले की या ग्रहाच्या वातावरणात आयोनाईज्ड कॅल्शियम शोधण्यात आले आहे.

Astronomers have discovered ionized calcium on a planet orbiting a star far from Earth. The planet is so hot that even iron will melt there immediately. Named Wasp-76b, the planet’s surface temperature rises above 2400 degrees centigrade. This temperature is so high that humans will evaporate immediately. The planet also has winds of toxic gases at speeds of up to 10,000 kilometers per hour.

PL/KA/PL/13 OCT 2021