30 लाखाचे अमली पदार्थ जप्त

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): मुंबईत मालाड इथे मेफेड्रॉन ‘किंवा  एम.डी. या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या जॉन डेव्हिड जोसेफ (37) रा. वसई या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 30 लाख रुपये किमतीचे 300 ग्रॅम एम.डी जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी त्याच्याविरुद्ध मालाड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदयान्वये गुन्हा नोंदवण्यात आला  आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर हत्येसह विविध प्रकारच्या गुन्ह्यांची  नोंद आहे. त्याला मुंबई परिसरातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. यामागे टोळी असण्याची शक्यता असून पोलीस सखोल तपास करत आहेत.

 

 

Tag- Drugs-worth-Rs-30-lakh-seized

SW/KA/DSR/13 JANUARY 2021