६ कोटी ४० लाख रुपये किंमतीचे २ जीनोम सिक्वेसिंग संयंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला दान

६ कोटी ४० लाख रुपये किंमतीचे २ जीनोम सिक्वेसिंग संयंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला दान

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेक्स्ट जनरेशन जीनोम सिक्वेसिंग next generation genome sequencing ही पद्धती वापरुन विषाणूंचे जनुकीय सूत्र ओळखता येते. त्यामुळे एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते. जीनोम सिक्वेसिंग वैद्यकीय प्रयोगशाळा (लॅब) मध्ये एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय नमुन्यांची चाचणी करता येणे शक्य होते. सध्याच्या कोविड – १९ विषाणू संसर्ग कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे शक्य होणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जीनोम सिक्वेसिंग संयंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस. जी. – बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण ६ कोटी ४० लाख रुपये किंमतीचे २ जीनोम सिक्वेसिंग संयंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला   Mumbai Municipal Corporation दान स्वरुपात दिले आहे. नायर रुग्णालयाचे माजी विद्यार्थी डॉ. मेहूल मेहता हे अमेरिकेतील हॉवर्ड मेडिकल स्कूलमध्ये नेत्र तज्ज्ञ असून अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत. त्यांनी सदर जीनोम सिक्वेसिंग संयंत्र उपलब्ध होण्यासाठी मुख्य भूमिका बजावली. त्यासोबत ए. टी. ई. चंद्रा फाऊंडेशन यांनी देखील सुमारे ४ कोटी रुपयांची मदत या संयंत्रांसाठी आणि त्याद्वारे होणाऱ्या चाचण्यांसाठी केली आहे. सदर जीनोम सिक्वेसिंग संयंत्राद्वारे एकाचवेळी ३८४ नमुन्यांची तपासणी होऊन ४ दिवसांच्या आत वैद्यकीय निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या Mumbai Municipal Corporation वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे, नायर रुग्णालयातील सूक्ष्मजीव वैद्यकीय विभाग प्रमुख डॉ. (श्रीमती) जयंती शास्त्री यांनी या प्रकल्पासाठी मुख्य योगदान दिले आहे.

स्पिनराझा औषधोपचार प्रकल्पाविषयीः

About Spinaraja Pharmaceutical Project:

स्पायनल मस्क्युलर ऍट्रॉफी (एस. एम. ए.) हा लहान मुलांमध्ये आढळणारा दुर्मिळ आजार असून त्यातून मुलांचे स्नायू विकसीत होत नाहीत. परिणामी, या आजाराने ग्रस्त संबंधीत मुलांना आयुष्यभर विकलांग जीवन जगावे लागू शकते किंवा त्यांचा मृत्यू देखील ओढवू शकतो. या आजारावरील औषधोपचार अत्यंत महागडे आहेत. ही बाब लक्षात घेता, अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्थित डायरेक्ट रिलिफ या बिगर शासकीय संस्थेने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये स्पायनल मस्क्युलर ऍट्रॉफी रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सदर आजाराने ग्रस्त १७ रुग्णांची निवड आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने केली आहे. या १७ रुग्णांना स्पिनराझा हे औषध देण्यासाठी डायरेक्ट रिलिफ ही संस्था सर्व आर्थिक भार उचलणार आहे. स्पिनराझा औषधाच्या एका डोसची किंमत सुमारे ८७ लाख रुपये इतकी असून पहिल्या वर्षी सुमारे ६ कोटी तर, त्यापुढील प्रत्येक वर्षी ३ कोटी २० लाख रुपये इतका खर्च संपूर्ण आयुष्यभर एका रुग्णाला करावा लागतो. ही आत्यंतिक महागडी उपचार पद्धती सदर निवडलेल्या १७ रुग्णांना पुरविण्यासाठी डायरेक्ट रिलिफ ही संस्था महानगरपालिकेला सहकार्य करीत आहे. यासाठी डॉ. रमेश भारमल यांच्यासह डॉ. (श्रीमती) सुषमा मलिक, डॉ. (श्रीमती) अल्पना कोंडेकर, डॉ. विशाल सावंत यांनी योगदान दिले आहे. डायरेक्ट रिलिफ संस्थेचे भारतातील सहकारी संस्था एस. एम. ए. फाऊंडेशन ऑफ इंडिया यांनी देखील यासाठी प्रयत्न केले आहेत.Donation of 2 Genome Sequencing Plants worth Rs. 6 crore 40 lakhs to BMC

ML/KA/PGB

4 Aug 2021