पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या केईएम रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणांत मुसळधार पावसामुळे खूप मोठी हानी  Heavy rains cause severe damage in Konkan होऊन येथील जनजीवन विस्कळीत झाले, आधीच तोक्ते वादळामुळे नुकसान झाले असताना या पावसामुळे नव्याने भर पडली. डोंगराळ नजीक असलेल्या भागात दरड कोसळून काही लोक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेनंतर कोकणातील पूरग्रस्तांसाठी तातडीच्या मदतीसाठी केईएम रुग्णालयातील प्रत्येक संवर्गातील कामगार वर्ग वार्डबॉय, डॉक्टर, परिचारिका, टेक्निशियन असिस्टंट सफाई कामगार यांच्याकडून मदतीसाठी लागणारे साहित्य सुका खाऊ बिस्किट फरसाण तांदूळ डाळ चहा पावडर साखर मीठ तेल मसाला कडधान्य माचिस टूथ ब्रश टूथपेस्ट साबण टॉवेल चादरी सॅनिटरी पॅड व गृह उपयोगी व संसारात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू च्या वाटप करण्यात आले.

चिपळूण जवळील खेर्डी, महापे कलबसते, पेठमाप या गावात मदतीचा हात दिला. केईएम रुग्णालयाच्या स्टाफने केलेल्या मदतीचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या प्रसंगी तृप्ती लोके, वंदना पाटील, आरती आंगणे, श्रुती गमरे,शुभांगी लाड ,भाग्यश्री सानप, प्रथमेश पोयेकर,मोनिका राठोड, स्नेहा पाटील,रमेश पेवेकर,अमित बनसोडे, वैभव जुवेकर, प्रफुल अहिरे , महिंद्र गरबडे, भाविन भोजे,हनुमंत कल्लाल ,शुभम कदम ,अमोल माने,आदी लोकांनी मेहनत घेतली. doctors and nurses of KEM Hospital who went to help the flood victims

SW/KA/PGB

4 Aug 2021