दिल्ली येथील रस्ते अपघातात अकोला जिल्ह्यातील एनएसजी कमांडोचा मृत्यू

अकोला, दि. 12 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): केंद्र सरकारच्या एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा दलात कमांडो म्हणून कार्यरत असलेल्या वैभव सुरेश माहुलकर यांचे कर्तव्यावर असताना अपघाती निधन झाले. मूळच्या अकोल्याच्या असलेल्या माहुलकर यांच्या वाहनाला दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील धुक्यामुळे अपघात झाला होता. दिल्लीत उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. ते 30 वर्षाचे होते. त्यांनी 6 वर्ष देशाची सेवा केली. शहीद कमांडो वैभव माहुलकर यांचे पार्थिव  विमानाने दिल्लीहून नागपुरात आणले व आज अकोल्यातील मलकापूर मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस विभाग व सीआरपीएफ यांच्या वतीने शहीद वैभव माहुलकर यांच्या सन्मानार्थ बंदुकीच्या 3 फेऱ्यांची सलामी देण्यात आली तसेच प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या वतीने त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

 

Tag- delhi-road-accident-NSG-comando-died

ML/KA/DSR/ 12 JANUARY 2021