दिल्लीत पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक

दिल्लीत पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिल्ली (Delhi) पोलिसांच्या विशेष दलाने (special cell) लक्ष्मीनगर परिसरातून एका पाकिस्तानी (Pakistan) दहशतवाद्याला   अटक केली आहे. तो 10 वर्षांहून अधिक काळ दिल्लीत राहत असल्याचे सांगितले जात आहे. मोहम्मद अश्रफ असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तो पाकिस्तानच्या पंजाबमधील नारोवालचा रहिवासी आहे. अश्रफची अटक हे विशेष दलाचे मोठे यश असल्याचे पोलीस मानत आहेत. अटक केल्यानंतर अश्रफला न्यायालयात हजर करण्यात आले. पटियाला हाऊस न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, अश्रफ भारतात राहून स्लीपर सेलसारखे काम करत होता. तो अली अहमद नूरी या नावाने दिल्लीच्या (Delhi) शास्त्रीनगरमध्ये राहत होता. अश्रफ प्रथम बांग्लादेश मार्गे सिलीगुडी सीमेवरून भारतात आला होता. पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संस्था आयएसआयने त्याला प्रशिक्षण दिले आहे. तेव्हापासून तो पाकिस्तानच्या (Pakistan) हँडलरच्या संपर्कात होता. ज्या हँडलरने त्याला भरती केले त्याचे सांकेतिक नाव नासीर होते. नासीरच अश्रफला सूचना देत होता.

विशेष दलाचे (special cell) पोलीस उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी मंगळवारी सांगितले की, अश्रफला सोमवारी रात्री 9.20 वाजता अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, अश्रफ स्लीपर सेल म्हणून काम करत होता आणि एक मोठा कट रचत होता. दिल्लीत (Delhi) राहून तो आपली ओळख पीर मौलाना म्हणून बनवत होता.

त्याने बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय ओळखपत्र मिळवले होते. ते बिहारमध्ये बनवण्यात आले होते. अश्रफकडे अनेक बनावट ओळखपत्रे सापडली आहेत. यापैकी एक अहमद नूरी या नावाने बनवण्यात आले होते. कागदपत्रांसाठी त्याने गाझियाबादमधील एका महिलेशी लग्न केले होते. पोलिसांच्या विशेष दलाने (special cell) त्याच्याकडून एके -47 रायफल, त्याची एक मॅगझिन, एक हातबॉम्ब आणि दोन राऊंड गोळ्यांसह दोन पिस्तुल जप्त केली आहेत.

A special team of Delhi Police has arrested a Pakistani terrorist from Laxminagar area. He is said to have been living in Delhi for more than 10 years. The terrorist’s name is Mohammad Ashraf. He is a resident of Narowal in Punjab, Pakistan. Police believe that Ashraf’s arrest is a great achievement of the special forces.

PL/KA/PL/13 OCT 2021