नामांतर शहीद दीनानिमित्त आज नागपूरात दलित संघटनांचे भीमसैनिकांना अभिवादन…

Police firing during a rally in Nagpur

नागपूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ Dr. Babasaheb Ambedkar University नामांतर लढ्यातील शहीदांना आज नागपुरात कामठी मार्गावरील इंदोरा येथील शहीद स्मारकावर विविध दलित संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले, from Dalit organizations,

भाजप,काँग्रेस ,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सहित रिपब्लिकन पक्ष,विविध सामाजिक संघटनां तर्फे By various social organizations आज पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना जयभीम ची सलामी देण्यात आली . यावेळी उपस्थित दलित संघटनांनी नामांतर लढ्यात शहीद झालेल्यांचा भीमसैनिकांच्या स्मरणार्थ घोषणा दिल्या   in memory of Bhimsainiks. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणासाठी झालेल्या प्रखर आंदोलनात नागपूरातील हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते . 4 ऑगस्ट 1978 ला नागपुरात काढण्यात आलेल्या मोर्चात पोलिसांच्या गोळीबारात Police firing during a rally in Nagpur 5 भीमसैनिक ठार झाले होते, तर अनेकजण जखमी झाले होते.

त्यानंतर पुन्हा नागपुरातच नामांतरासाठी 6 डिसेंबर 1979 ला मोर्चा काढण्यात आला होता त्यातही घटनेची पुनरावृत्ती होऊन पोलिसांच्या गोळीबारात 4 जण ठार झाले होते . शेवटी 14 जानेवारी 1994 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामकरण झाले , परंतु नामांतर लढ्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 4 ऑगस्ट ला नागपूरात नामांतर शहीद दिवस साजरा केला जातो . Dalit organizations greet Bhimsainiks

ML/KA/PGB

4 Aug 2021