पालिकेका रुग्णालयातून कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या  रॅकेटचा पर्दाफाश 

मुंबई, दि.19( एमएमसी न्युज नेटवर्क):खाजगी चाचणी केंद्रातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णालय बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देण्याच्या घटनेनंतर आता अशीच

पालिकेका रुग्णालयातून कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून देणाऱ्या रॅकेटचा वागळे इस्टेट गुन्हे शाखा युनिट-५ च्या पोलीस पथकाने पर्दाफाश करून गुन्हयातील अफसर तेजपाल मंगवाना (३४) व संकपाल भास्कर धवने (३४)

या दोन आरोपींना अटक केली आहे.

ठाणे पोलिस आयुक्तालय हददीमध्ये ठाणे महानगरपालीकीचे वैदयकीय क्षेत्रातील काही कर्मचारी कोणत्याही व्यक्तीचा स्वब न घेताच १२५० च्या बदल्यात आधारकार्ड घेवुन ठाणे महानगरपालीकेच्या लॅबचा खोटा निगेटीव्ह आर टी पीसीआर (RT – PCR ) रिपोर्ट देत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट -५ वागळे इस्टेट चे व.पो.निरी. विकास घोडके यांना मिळाली होती .या बातमीची खातरजमा करण्याकरिता एका डमी ग्राहकामार्फत कोरोना आजारामुळे मयत झालेल्या दोन व्यक्तींचे आधारकार्ड खोटे निगेटीव्ह रिपोर्ट प्राप्त करण्याकरिता पाठवण्यात आले .त्यानुसार काल आरोपीचे बँक खात्यात२५०० रुपये मोबदला म्हणुन जमा करण्यात आले .

त्याचवेळी आरोपी खोटा निगेटीव्ह RT – PCR रिपोर्ट देत असताना पोलिसांनी सापळा रचुनअफसर तेजपाल मंगवाना , राह . दादोजी कोंडदेव स्टेडीअम समोर ठाणे व संकपाल भास्कर धवने , राह . सम्राटनगर मुंब्रा ठाणे या दोघांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे . या आरोपीकडुन खोटे RT – PCR निगेटीव्ह रिपोर्ट जप्त करण्यात आले आहेत .Officer Tejpal Mangwana, Rah. In front of Dadoji Konddev Stadium, Thane and Sankpal Bhaskar Dhawane, Rah. The two have been arrested from Samratnagar Mumbra Thane. False RT-PCR negative reports have been seized from this accused.

हे दोन्ही आरोपी ठाणे महानगरपालीकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये कंत्राटी पध्दतीने परिचर ( वॉर्डबॉय ) म्हणुन काम करतात . सदरचे आरोपी हे एखाद्या व्यक्तीस कोणत्याही कारणास्तव निगेटीव्ह RT – PCR रिपोर्ट हवा असल्यास त्याचेकडुन १००० ते १५०० रुपये इतकी रक्कम स्विकारून त्याचा कोणताही स्वब न घेता फक्त आधारकार्ड घेवुन कोव्हीड टेस्टींग सेंटरवर स्वब न घेतलेली स्वबस्टीक टेस्टींगकरिता लॅबमध्ये जमा करीत असत . सदर स्टीक वर कोणताही स्वब नसल्याने टेस्टींग दरम्यान निगेटीव्ह असल्याबाबत रिपोर्ट लॅब मधुन प्राप्त होत असे . सदरचा RT – PCR निगेटीव्ह रिपोर्ट आरोपीत इसम हे संबंधीत व्यक्तीस देत असे . अशा प्रकारे ते शासनाकडुन मोफत होणा – या टेस्ट करीता रक्कम स्विकारून शासकीय लॅब मधुन निगेटीव्ह रिपोर्ट प्राप्त करून शासकीय यंत्रणेची फसवणुक करीत असल्याचे निष्पन्न झालेले आहे . त्याच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाणे येथे कलम ४२०,३४ अन्वये दाखल करण्यात आला आहे . या आरोपीला २७ मे पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट ५ चे सहा.पो.निरी . भुषण शिंदे करीत आहेत .

In Thane Police Commissionerate, some employees of Thane Municipal Corporation’s medical field are giving false negative RT-PCR report of Thane Municipal Corporation’s lab by taking Aadhaar card instead of 1250 without taking any person’s swab. Niri. Vikas Ghodke had received this information. To confirm this news, Aadhaar cards of two persons who died due to corona disease were sent by a dummy customer to receive false negative reports. Accordingly, Rs. 2500 was deposited in the bank account of the accused yesterday.

At the same time, the police set a trap while the accused was giving a false negative RT-PCR report

SW/KA/PGB

19 may 2021