लसींच्या पुरवठ्यासाठी महापालिकेकडे तीन कंपन्यांचे प्रस्ताव मात्र एकही लस उत्पादक कंपनी नाही 

मुंबई, दि.19 ( एमएमसी न्युज नेटवर्क): कोविड-१९ प्रतिबंध लसींचे १ कोटी डोस पुरवण्यासाठी महापालिकेने जागतिक स्तरावर स्वारस्य अभिव्यक्तींकडून मागवलेल्या दरपत्रिकांचा कालावधी हा २५ मे २०२१ पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, तोपर्यंत तीन कंपन्यांकडून महापालिकेला लसी पुरवण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. परंतु यामध्ये एकही उत्पादन कंपनी नसल्याची माहिती मिळत आहे. The Mumbai Municipal Corporation (MMC) had invited various companies to submit proposals for the supply of 1 crore doses of Kovid-19 preventive vaccine.

कोविड-१९ प्रतिबंधक लसींचे १ कोटी डोस पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेने जागतिक स्तरावर स्वारस्य अभिव्यक्ती  प्रकाशित करुन, वेगवेगळ्या कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी निमंत्रित केले होते. १२ मे २०२१ रोजी ही सूचना प्रकाशित करण्यात आली. त्यानुसार १८ मे २०२१ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत महापालिकेकडे स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव सादर करावयाचे होते. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता हे प्रस्ताव उघडण्यात येणार होते. परंतु शेवटच्या दिवसापर्यंत एकही प्रस्ताव न आल्याने प्रशासनाने याची मुदत २५ मे २०२१ पर्यंत वाढवली.    मुदत वाढवल्यानंतर संध्याकाळी तीन प्रस्ताव महापालिकेला सादर करण्यात आले आहेत. परंतु यामध्ये लस उत्पादन करणा-या कंपन्यांपैकी एकही कंपनी नसल्याची सूत्रांकडून कळते . सध्या सिरम, भारत बायोटेक आणि डॉ.रेड्डी या तीन कंपन्या लस निर्मिती करत असून, यापैकी कोणीही पुरवठ्यासाठी प्रस्ताव सादर केला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ज्या तीन कंपन्यांचे प्रस्ताव सादर झालेले आहेत, त्यांचे उत्पादन कंपन्यांशी काय आणि कशाप्रकारे संबंध आहेत, याची पडताळणी करण्यात येणार आहे.

In order to supply 1 crore doses of Kovid-19 preventive vaccine, the period of tariffs invited by NMC from global interest groups has been extended till May 25, 2021. However, until then, three companies have submitted proposals to supply the vaccine to the corporation. But it is learned that there is no manufacturing company in it.

SW/KA/PGB

19 May 2021