भारत-जोडो यात्रेला कोरोना अलर्ट जारी

 भारत-जोडो यात्रेला कोरोना अलर्ट जारी

नवी दिल्ली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  चीनमध्ये पुन्हा उसळलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार आता देशात सावधगिरीची पावले उचलत आहे. देशभर चर्चेचा विषय असलेल्या आणि हजारोंच्या उपस्थितीत सुरू असलेल्या भारत-जोडो यात्रेला यामुळे कोरोना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहून भारत-जोडो यात्रे दरम्यान कोरोना प्रतिबंधक गाईडलाईन्सचे काटेकोरपणे पालन करण्याची विनंती केली आहे. तसेच यात्रे दरम्यान या गाईडलाईन्सचे उल्लंघन झाल्यास सार्वजनिक आरोग्य आणिबाणी अंतर्गंत भारत- जोडो यात्रा स्थिगित करण्यात येईल असा इशारा देखील आरोग्य मंत्र्यांनी दिला आहे.

भारत जोडो यात्रेमध्ये पुढील गाईडलाइन्सचे पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

  • मास्क आणि सॅनिटाझर चा वापर करावा.
  • कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या व्यक्तिंचाच यात्रेमध्ये सहभाग असावा
  • यात्रेमध्ये सहभागी होण्यापूर्वी आणि सहभागी झाल्यानंतर संबंधित व्यक्तींना अलगीकरणात ठेवण्यात यावे.

भारत- जोडो यात्रा सध्या राजस्थानात असून लवकरच ती हरयाणामध्ये प्रवेश करणार आहे.

SL/KA/SL

21 Dec. 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *