एकल डोस स्पुटनिक लाईट कोरोना लशीला रशियाची मान्यता

एकल डोस स्पुटनिक लाईट कोरोना लशीला रशियाची मान्यता

मॉस्को, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रशियाची (Russia) कोरोना (corona) विरोधी लस स्पुटनिक व्ही ने (Sputnik V) एक नवीन आवृत्ती आणली आहे. या लशीला स्पुटनिक लाइट (Sputnik Light) असे नाव देण्यात आले आहे आणि त्याला सरकारकडून मान्यता मिळाली आहे. ही लस 80 टक्क्यांपर्यंत प्रभावी मानली गेली आहे. स्पुटनिक लाइटचा फक्त एकच डोस कोरोनाशी लढण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले जाते. या लशीला वित्तपुरवठा करणार्‍या रशियाच्या थेट गुंतवणूक निधीने (आरडीआयएफ) (RDIF) एका निवेदनात म्हटले आहे की दोन डोसवाल्या स्पु्टनिक व्ही लशीच्या तुलनेत एक डोसवाली स्पु्टनिक लाइट अधिक प्रभावी आहे. स्पुटनिक व्ही 91.6 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे तर स्पुटनिक लाइट 79.4 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे.

कोरोना लसीकरणाला वेग येईल
Corona vaccination will be accelerated

त्याच्या निष्कर्षात सांगण्यात आले आहे की 5 डिसेंबर 2020 ते 15 एप्रिल 2021 दरम्यान रशियामध्ये (Russia) सुरु असलेल्या व्यापक लसीकरण मोहिमेमध्ये (vaccination drive) ही लस देण्यात आली, त्यानंतर 28 दिवसांनी त्याची आकडेवारी घेण्यात आली होती. एकल डोसच्या लशीच्या लाईट आवृत्तीमुळे (Sputnik Light) कोरोना लसीकरणाला (corona vaccination) वेग येईल आणि ती साथीचा प्रसार रोखण्यास मदत करेल असे मानले जात आहे. आरडीआयएफने म्हटले आहे की या एक डोसवाल्या लशीची किंमत 10 डॉलर म्हणजेच सुमारे 737 रुपयांपेक्षाही कमी आहे. स्पु्टनिक-व्हीची (Sputnik V) ही लाईट कोरोना लस आवृत्ती देखील मॉस्कोच्या गमलेया रिसर्च इन्स्टीट्युटने तयार केली आहे.

रशियाच्या (Russia) लशीला 60 पेक्षा जास्त देशांमध्ये वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. परंतु या लशीला अद्याप युरोपियन मेडिसीन एजन्सी (EMA) किंवा अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मान्यता दिलेली नाही.

Russia’s anti-corona vaccine Sputnik V has brought a new version. The vaccine is called Sputnik Light and is approved by the government. The vaccine is considered to be up to 80 percent effective. Only a single dose of Sputnik light is said to be able to fight the corona.

PL/KA/PL/7 MAY 2021