हृदयाशी संबंधित चाचण्य़ांद्वारे समजू शकतो कोविड रूग्णांमधील मृत्यूचा धोका

हृदयाशी संबंधित चाचण्य़ांद्वारे समजू शकतो कोविड रूग्णांमधील मृत्यूचा धोका

लंडन, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड-संक्रमित (covid-19) रुग्णांच्या हृदयाशी संबंधित समस्यांसाठीच्या (heart-related problems) चाचण्यांमधून त्यांच्या मृत्यूचा धोका किती गंभीर आहे याची माहिती मिळु शकते. सार्स-कोव्ह-2, कोविड-19 ला कारणीभूत ठरणारा विषाणू प्रामुख्याने श्वसनमार्गावर परिणाम करत असला तरी तो हृदयाची गती अनियमित होणे, तीव्र कोरोनरी सिंड्रोम, मायोकार्डिटिस आणि फुप्फुसातील रक्तवाहिनीतील अडथळा यासहित हृदयाशी संबंधित गुंतागुतीच्या समस्यांनाही जन्म देतो.

रूग्णालयात दाखल झालेल्या 1,401 रुग्णांची तपासणी
Examination of 1,401 patients admitted to the hospital

इटलीच्या सालेर्नो विद्यापीठाच्या संशोधकांच्या एका पथकाने कोविडचे (covid-19) निदान झाल्यानंतर उपचारांसाठी रूग्णालयात दाखल झालेल्या 1,401 रुग्णांची तपासणी केली. सुमारे 226 जणांची (16.1 टक्के) दाखल झाल्यानंतर 48 तासांच्या आतच ट्रान्सस्टोरॅसिक इकोकार्डियोग्राफी झाली. त्यातील 68 रूग्ण (30.1 टक्के) इस्पितळात मरण पावले. लो लेफ्ट वेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन (एलव्हीईएफ), लो ट्राइकसपिड एनुलर प्लेन सिस्टोलिक एक्सकर्शन आणि तीव्र रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम स्वतंत्रपणे रुग्णालयातील मृत्यूशी संबंधित होते.

प्राणघातक परिणामाची शक्यता असलेल्या रूग्णांची ओळख पटवण्यासाठी उपयुक्त
Useful for identifying patients with potential for fatal outcome

सालेर्नो विद्यापीठातील मुख्य लेखक एंजेलो सिल्वरिओ यांनी सांगितले की रोगाच्या तीव्रतेचे क्लिनिकल आणि इकोकार्डिओग्राफिक निकष कोविड (covid-19) रुग्णांचा रुग्णालयातील मृत्यू दरासाठी जास्त धोका आहे की नाही हे ठरविण्यात मदत करू शकतात. हे संशोधन युरोपियन जर्नल ऑफ क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रसिद्ध झाले होते.

संशोधनामुळे प्राणघातक परिणामाची जास्त शक्यता असलेल्या रूग्णांची ओळख पटवण्यासाठी प्रारंभिक एलव्हीईएफ फार उपयुक्त ठरू शकते कारण हृदयाशी संबंधीची गुंतागुत (heart-related problems) कोविडच्या रूग्णांच्या परिणामावर नकारात्मक प्रभाव टाकू शकते. संशोधनामुळे शरीराद्वारे माहिती मिळते की उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोग असलेल्या काही लोकांमध्ये एकदा कोरोना विषाणूची (corona virus) लागण झाल्यानंतर अधिक गंभीर लक्षणे आणि गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

Tests for heart-related problems in hospitalized covid-infected patients can reveal how serious their risk of death is. Although the virus that causes SARS-Cove-2, Covid-19 mainly affects the respiratory tract, it also causes heart-related complications, including irregular heartbeat, acute coronary syndrome, myocarditis, and pulmonary embolism. Some people with heart disease can develop more serious symptoms and complications once they are infected with the corona virus.

PL/KA/PL/22 JULY 2021