#कोरोनाच्या भीतीपोटी ऑस्ट्रेलियामध्ये ‘शारीरिक संबंधांसाठी’ देखील मार्गदर्शक तत्त्वे

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात आणि जगात कोरोना साथीचा धोका कमी झालेला नाही. दरम्यान, अनेक देशांमध्ये कोव्हिड-19 संदर्भात अनेक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. ऑस्ट्रेलियासारख्या देशातही अलिकडेच हात लावणे आणि आपल्या जोडीदाराच्या गळाभेटी संदर्भात काही नियम तयार करण्यात आले आहेत. जगातील इतर देशांप्रमाणेच ऑस्ट्रेलियादेखील या यादीमध्ये सामील झाला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य प्राधिकरणाने देशासाठी कोव्हिड-19 ची काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्यामध्ये शयनगृहात जोडीदारासोबत शारिरिक संबंध प्रस्थापित करण्यापासून ते प्रेम करण्यापर्यंत काही सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करावे लागणार आहे. या बातमीची समुह माध्यमांवर चांगलीच प्रसिद्धी होत आहे. आरोग्य प्राधिकरणाच्या वतीने, पती पत्नी किंवा युगुलाने सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी दीड मीटरचे अंतर, हँडवॉश किंवा जोडीदाराला शयनगृहात सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या नियमांचे पालन करावे लागेल.

कोरोना विषाणू टाळण्यासाठी लोकांच्या बंद खोलीतील जीवनातही नियम कायदे असतील. ज्यामध्ये शयनगृहात जोडीदाराशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यादरम्यान या नियमांचे अनुसरण करावे लागेल. शयनगृहात शारीरिक अंतर ठेवावे लागेल. त्याच वेळी लोकांना एकल लैंगिकतेचा (सोलो सेक्स) देखील सल्ला देण्यात आला आहे. म्हणजेच नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, जर तुम्ही एखाद्या खोलीत जवळिक साधत असाल तर तुम्हालाही हे नियम पाळावे लागतील. तसेच कोणत्याही बाहेरील व्यक्तीशी संबंध ठेवणे धोकादायक आहे. अनेक देशांमध्ये आजही एकल लैंगिकता सर्वात सुरक्षित मानले जात आहे.

Tag-Corona/Guidlines/Austrelia
PL/KA/PL/14 JAN 2021