कोरोना साथीमुळे घटले कार्बन उत्सर्जन

कोरोना साथीमुळे घटले कार्बन उत्सर्जन

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या अनेक दशकांपासून जीवाश्म इंधनांचा (Fossil Fuel) वापर बंद करण्यावर जोर दिला जात आहे. जगातील प्रदूषण कमी होण्यासाठी तसेच हवामान बदल (Climate Change) आणि जागतिक तापमान बदल (Global Warming) यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शास्त्रज्ञ शक्य तितक्या लवकर पर्यावरणासाठी (Environment) अधिक योग्य हरित उर्जेचा (Green Energy) वापर स्वीकारण्याबाबत सांगत आहेत. गेल्या वर्षी पसरलेल्या कोविड-19 (Covid-19) साथीचा परिणाम उर्जा उत्पादन क्षेत्रावर परिणाम झाला आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनामध्ये असे आढळले आहे की उर्जेसाठी कोळशाचा (Coal) वापर कमी करण्याच्या दिशेने वेग वाढवण्याचे काम केले आहे.

एक मोठी संधी

बर्लिन आणि पॉट्सडॅममधील अर्थशास्त्रज्ञांनी कोविड-19 (Covid-19) साथीच्या काळातील ऊर्जा प्रणाली आणि वीज मागणीचा अभ्यास केला. या अभ्यासाची पडताळणी करताना, त्यांना आढळले की साथीने एकीकडे लोकांच्या जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम केला आहे, परंतु दुसरीकडे त्याने कोळशाचा (Coal) वापर झपाट्याने कमी करण्याची मोठी संधी देखील उपलब्ध करुन दिली आहे. योग्य धोरणात्मक उपायांमुळे उर्जा क्षेत्राचे उत्सर्जन पूर्वी ज्याप्रमाणे विचार केला जात होता त्यापेक्षा जास्त वेगाने कमी होऊ शकते.

कोळशावर सर्वाधिक परिणाम

पॉट्सडॅमच्या इंस्टीट्यूट ऑफ क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्चचे संशोधक आणि या संशोधनाचे प्रमुख लेखक क्रिस्टोप बेर्ट्राम सांगतात की कोरोना आपत्तीचा अन्य ऊर्जेच्या स्त्रोतांपेक्षा कोळशावर (Coal) खूपच वाईट परिणाम झाला आहे आणि त्याचे कारण सांगणे सोपे आहे. जर विजेची मागणी कमी असेल तर सर्वप्रथम कोळसा प्रकल्प बंद होतात. याचे कारण म्हणजे इंधन ज्वलनाची प्रक्रिया महाग होते. बेर्ट्राम यांचे म्हणणे आहे की प्रकल्प संचालकांना प्रत्येक टन कोळशासाठी किंमत मोजावी लागते. तर पवन उर्जा आणि सौर उर्जा प्रकल्प एकदा स्थापित झाल्यानंतर ते चालवण्याचा खर्च खुपच कमी असतो आणि मागणी कमी झाल्यावरही ते सुरु ठेवले जाऊ शकतात. याच कारणामुळे 2020 मध्ये वीज निर्मितीत जीवाश्म इंधन मागे पडले आहे.

कार्बन उत्सर्जन कमी

2020 मध्ये ऊर्जा उत्पादनातून कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन (carbon dioxide Emission) 7 टक्क्यांनी कमी झाले आहे. केवळ भारत, अमेरिका आणि युरोपियन देश पाहिले तर याठिकाणी झालेल्या नाटकीय बदलाचे चित्र पाहायला मिळते. याठिकाणी महिन्याची मागणी 2019 च्या तुलनेत 20 टक्के कमी झाली आहे आणि कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन (carbon dioxide Emission) 50 टक्के कमी झाले. संशोधकांचा अंदाज आहे की आता हे उत्सर्जन 2018 मधल्या उच्च पातळीपर्यंत पोहोचू शकणार नाही. या संशोधनाचे सह-लेखक, गुनार लॉडरेर यांचे म्हणणे आहे की, सध्याच्या संकटामुळे 2021 पर्यंत विजेची मागणी 2019 च्या पातळीवरच राहील, अशी अपेक्षा आहे. सध्याची कमी कार्बन उत्पादनावर होणारी गुंतवणूक लक्षात घेता त्यावर्षीसुद्धा जीवाश्म उर्जा उत्पादन कमी होईल.

लॉडरेर यांनी सांगितले की जोपर्यंत स्वच्छ वीज निर्मितीची वाढ वीजेच्या मागणीमध्ये वाढत राहिल तोपर्यंत ऊर्जा क्षेत्रात कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन (carbon dioxide Emission) कमी होत जाईल. 2022 ते 2025 दरम्यान काही नूतनीकरणक्षम उर्जा प्रकल्प आल्यानंतरही, जर केवळ विजेची मागणी असामान्य रुपाने वाढली तरच जीवाश्म उर्जा उत्पादन साथीच्या आधीच्या पातळीवर जाईल. संशोधक अशा प्रकारच्या बदलाची अपेक्षा करत आहेत कारण जीवाश्म ऊर्जा पर्यावरणदृष्ट्या हानिकारक तर आहेत्च शिवाय आर्थिकदृष्ट्याही खूपच धोकादायक आहे. साथीच्या परिस्थितीने राजकारण्यांना जीवाश्म इंधनांचा वापर कमी करण्याची मोठी संधी मिळाली आहे.

PL/KA/PL/11 FEB 2021