कॉंग्रेस पक्ष कायम ओबीसीं आरक्षणा विरोधात

कॉंग्रेस पक्ष कायम ओबीसीं आरक्षणा विरोधात

औरंगाबाद, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओबीसी जागर अभियानाअंतर्गत झालेल्या विभागीय मेळाव्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. राज्यातील ओबीसींना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, ते माझे, तुमचे आणि आपल्या सगळ्यांचे लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे आज आपल्यात नाहीत. पण या मेळाव्याचे निमित्ताने मी त्यांना अभिवादन करतो, अशा शब्दात कराड यांनी मुंडेची आठवण काढली. ओबीसी जागर अभियान मेळाव्यात मार्गदर्शन करतांना केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ भागवत कराड Union Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करतांनाच केंद्रातील मोदी सरकारने आपल्या मंत्रीमंडळात ओबीसी, दलित आणि आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व दिले. डॉ कराड म्हणाले, मोदी सरकारच्या ७२ जणांच्या मंत्रीमंडळात २७ ओबीसी, १२ दलित आणि १० आदिवासी मंत्री आहेत. त्यांनी सगळ्या जाती, समाजांना सोबत घेऊन विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले आहे. मात्र आज ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न राज्यात निर्माण झाला आहे. पारतंत्र्यात असतांना पहिल्यांदा ओबीसी जातीची गणना करण्यात आली. त्यांनतर १९५५ साली जातींची यादी तयार होऊन त्यामध्ये ८३७ जाती जाहीर करण्यात आल्या. ७९ साली मंडल आयोगाने ७४३ जातींचा मागासवर्गात समावेश केला. ८० मध्ये या संदर्भातला अहवाल आयोगाने सरकारला दिला, पण देशात कॉंग्रेसची सत्ता असल्यामुळे तो अहवाल दडवून ठेवण्यात आला. १९९० साली जेव्हा व्ही.पी.सिंग देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा मंडल आयोगाने या जातींना २७ टक्के आरक्षण लागू केले, असा ओबीसी आरक्षणाचा प्रवास होता, असे डॉ कराड यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसचा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला कायम विरोध होता, असा आरोप त्यांनी केला. राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करणारे कार्यकर्ते हे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे होते, तेव्हा या नेत्यांना ओबीसी आरक्षणावर बोलण्याचा अधिकारच नाही, अशी टीका देखील डॉ. कराड यांनी यावेळी केली. पंधरा महिने उलटून गेले तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणा संदर्भातली माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली नाही, इम्पेरिकल डाटा दिला जात नाही, त्यामुळे हे सरकार ओबीसी विरोधी असल्याचे स्पष्ट होते, असेही डॉ. कराड म्हणाले.Therefore, it is clear that this government is anti-OBC. Karad said.

आधीच उपाशी त्यात उपवास अशी आज ओबीसीची स्थिती आहे अस मत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी व्यक्त केलं. येणाऱ्या निवडणुकांमध्ये अन्याय खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. मात्र निवडणुकीपुर्वी सरकारने ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढला तर आम्ही तुमचं कौतुक देखील करु असेही त्यांनी सांगितले. आज औरंगाबाद येथे भाजपचा ओबीसी जागर मराठवाडा विभाग मेळावा पार पडला. त्यात त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, की आरक्षणाचा लढा जे अशक्त आहेत त्यांच्यासाठी आहे. वंचितांना, पीडितांना सामान्यांना न्याय देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनाी आरक्षण दिले. ४२ वर्षांपासून लढा चालू आहे. ताकद देण्यासाठी जात आहे. जो जास्त संख्येने आहे, तो बहुजन. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० टक्के आरक्षण दिलं, ज्यांची आर्थिक ताकत नाही त्या सर्वांना त्यांनी आरक्षण दिलं. राज्यात देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis in the state नेतृत्वातील सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्या मराठा समाजाचं आरक्षण आज संपुष्टात आलं. ओसीबी समाजाचं आरक्षण बचाव करण्याचा प्रयत्न आम्ही केला, ते आरक्षण आज संपुष्टात आलं. या देशामध्ये अनेक राज्य आहेत. त्यांनी आपल्या राज्यात, मंत्रिमंडळात विधानसभेत निर्णय घेऊन बहुजनांना न्याय दिला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर ओबीसींचे आरक्षण रद्द झाले. हे सरकार आल्यानंतर ५० टक्क्यांच्या खालचं सुद्धा आरक्षण संपुष्टात आलं आहे, अशी टिका पंकजा मुंडे यांनी मविआ सरकारवर केली. मराठा समाजाच्या पाठित खंजीर य खुपसण्याचे कामही त्यांनीच केले. ओबीसींचे राजकीय भविष्य काय आहे ? ओबीसींची जशी राजकीय आरक्षणाची मागणी आहे तशीच मराठा सामाजाला शिक्षण, रोजगारामध्ये आरक्षण हवय. या दोन्ही समाजाचा समन्वय सरकारने करावा व त्यांच्या हक्काच्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.Congress party opposes OBC reservation

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड व भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज भाजपाचा ओबीसी जागर मराठवाडा विभाग मेळावा औरंगाबादेत पार पडला. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, प्रवीण घुगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ML/KA/PGB

12 Oct 2021