उत्तर भारतात थंडीची प्रचंड लाट

नवी दिल्‍ली, दि. 14 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): संपूर्ण उत्तर भारतात थंडीची प्रचंड लाट आली आहे. देशातल्‍या अनेक भागांमध्‍ये तापमान सामान्‍यपेक्षाही खाली उतरले आहे. काही ठिकाणी हिमवर्षाव तर काही ठिकाणी दाट धुक्‍याचे वातावरण आहे. थंडीमुळे लोकांना अडचणींचा सामाना करावा लागत आहे. जम्‍मू-काश्‍मीर मधल्‍या श्रीनगर येथे गेल्‍या आठ वर्षांमधल्‍या सर्वात कमी तापमानाची नोंद झााली आहे. राजधान दिल्‍ली मधेही दाट धुक्‍यासह किमान तापमान 3.2 डिग्री सेल्सिअस इतके खाली आले आहे. राजस्‍थानमधल्‍या गंगानगर मध्‍ये सर्वाधिक किमान तापमान 0.2 डिग्री सेल्सिअसची नोंद करण्‍यात आली आहे.

दरम्‍यान, येत्‍या 3-4 दिवसांमध्‍ये उत्तर / उत्तर-पश्चिमी कोरड्या वाऱ्यांमुळे उत्तर पश्चिमी भारतातल्‍या अधिकतर भागांमध्‍ये किमान तापमान सामान्‍यपेक्षा कमी राहण्‍याची शक्‍यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.

 

भारतातली 9 सर्वात थंड प्रदेश

केलांग : लाहौल आणि स्‍पीतिचा प्रशासकीय केंद्र केलांग शून्‍य तापमानामुळे हिमाचल प्रदेशचे सर्वात थंड हवेचे ठिकाण बनला आहे. आयएमडीच्‍या प्रादेशिक केंद्रानुसार बुधवारी केलांग येथील तापमान शून्‍य ते उणे 11.4 डिग्री सेल्सिअस होते.

श्रीनगर : जम्‍मू-काश्‍मीरची राजधानी श्रीनगरमध्‍ये बुधवारी गेल्‍या आठ वर्षांमधला सर्वात न्‍यूनतम तापमानाची नोंद केली गेली. हवामान खात्‍यानुसार श्रीनगर मध्‍ये न्‍यूनतम तापमान शून्‍य ते 7.8 डिग्री सेल्सिअस पेक्षाही कमी होता. 14 जानेवारी 2012 रोजी शहरात असेच न्‍यूनतम तापमानाची नोंद झाली होती.

कल्प: हिमाचल प्रदेशमधील किन्‍नौर जिल्‍ह्यातील एक छोटे आणि लोकप्रिय पर्यटन स्‍थळ कल्‍पा मध्‍ये न्‍यूनतम तापमान शून्‍य ते 2.6 डिग्री सेल्सिअर पेक्षा कमी नोंद होती.

गंगानगर: राजस्‍थान मधल्‍या काही भागांमध्‍ये थंडी कायम असून, येथील गंगानगरमध्‍ये 0.2 डिग्री सेल्सिअस इतक्‍या कमी तापमानाची नोंद झाली आहे.

नारनौल : पंजाब आणि हरियाणा या दोन्‍ही राज्‍यांमधील नारनौल हे 1.4 डिग्री सेल्सिअस तापमानासह सर्वात थंड ठिकाण म्‍हणून नोंदविले गेले.

हिसार: हिसार येथील न्‍यूनतम तापमान 1.7 डिग्री सेल्सिअस होता.

चुर्क: उत्तर प्रदेशातल्‍या सोनभद्र जिल्‍ह्यातील एक छोटे शहर चुर्क येथे बुधवारी पारा सामान्‍य तापमानापेक्षा कमी म्‍हणजे 3.2 डिग्री सेल्सिअस इतका नोंदविला गेला. दाट धुक्‍यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.

भिवानी: हरियाणामधील भिवानी येथील तापमान 2.8 डिग्री सेल्सिअस इतके झाले.

शिमला: हिमाचल प्रदेशाची राजधानी तसेच एक लोकप्रिय पर्यटन स्थळ शिमला येथील न्यूनतम तापमान 5.7 डिग्री सेल्सिअस होते.

 

 

Tag- cold-in-north-india

DSR/KA/DSR/14 JANUARY 2021