उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे

 उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे

लातूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू मुळे झाला असून शहरातील सर्व उद्याने प्रतिबंधित झोन घोषित करण्यात आली आहेत.
शहरातील गांधी उद्यानात आज आणखी एक कावळा मृत अवस्थेत आढळला.

लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील उद्यानात मागील आठवड्यात अनेक कावळे मृत अवस्थेत आढळून आले होते, सर्व मृत कावळ्याने नमुने तपासणीसाठी पुणे येथे प्रयोग शाळेत पाठविले होते. पुणे प्रयोग शाळेने कावळ्याचे नमुने भोपाळ येथे पाठवले होते. भोपाळ येथील प्रयोग शाळेच्या अवहालात कावळ्याचा मृत्यू हा ब्रडफ्ल्युमुळे झाल्याचे निष्पन्न झाल्याने उदगीर शहरातील सर्व उद्याने नगरपालिका प्रशासनाने प्रतिबंधित झोन म्हणून घोषित केली आहेत. आज आणखी एक कावळा गांधी उद्यानात मृत अवस्थेत आढळून आल्याने प्रशासन आणखीन अलर्ट मोडवर आला आहे.

ML/ML/PGB 19 Jan 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *