पद्मभूषण जाहीर होताच सुधा मूर्ती विठ्ठल दर्शनाला…

 पद्मभूषण जाहीर होताच सुधा मूर्ती विठ्ठल दर्शनाला…

सोलापूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  कर्नाटकसह आमच्या सर्व परिसरात विठ्ठलाचा अर्थात पांडुरंगाच्या भक्तीचा मोठा पगडा आहे आज आपणास पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. त्यामुळे या पुरस्काराचा आनंद व्यतीत करण्यासाठी आपण पंढरपुरात आलो असल्याची प्रांजळ भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केली.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सुधा मूर्ती यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. यानंतर सुधा मूर्ती या पंढरपुरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. प्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने सुधा मूर्ती यांना पद्मभूषण पुरस्कारा जाहीर झाल्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी त्यांनी वारकरी सांप्रदायाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच इन्फोसिस फाउंडेशन बद्दल ही माहिती देत महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन्ही राज्य आपल्याला आईसारखे असल्याची भावना व्यक्त केली.

ML/KA/SL

26 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *