आर्यनखान 20 तारखेपर्यंत आर्थररोडचा पाहुणा …

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रूझवरील ड्रग्स drugs’ case  प्रकरणी अटकेत असलेला अभिनेतापुत्र आर्यनखान त्याच्या सहकाऱ्यासह 20 तारखेपर्यंत आर्थररोड जेल चा पाहुणा असेल , त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी वरचा फैसला कोर्टाने court 20 पर्यंत राखून ठेवला आहे.

आर्यनखान आणि त्याचे इतर साथीदार ड्रग्सच्या खरेदी , विक्री आणि सेवन प्रकरणी गेल्या 12 दिवसांपासून अटकेत in custody आहेत .आर्यन कडे प्रत्यक्ष ड्रग्स सापडले नसले तरी त्याच्या मोबाईल मधील संभाषण हे एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचा दावा ncb ने सत्र न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांच्यासमोर केला तर आर्यन च्या वकिलांनी हा दावा फेटाळून लावत त्याचे वय आणि त्याचे सामाजिक स्थान लक्षात घेण्यात यावे अशी विनंती केली होती .

मोबाईल phone conversation वरचे संभाषण हा पुरावा नाही , अशी भाषा आजच्या तरूणाईत आम बात असल्याचे त्याचे वकील म्हणाले .

इतर दोन आरोपींच्या वकिलांनी ही आपापले म्हणणे मांडले, यातच न्यायालयाची वेळ संपली . त्यामुळे येत्या 20 तारखेला  आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून या जामीन अर्जावरील निर्णय देण्याचा आपला प्रयत्न राहील असे सत्र न्यायालयाने court स्पष्ट केले आहे

ML/KA/PGB

14 Oct 2021