#तुर्कीमधील मुस्लिम धार्मिक नेते अदनान ओक्तर यांना लैंगिक गुन्ह्यासाठी 1075 वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुर्कीमधील मुस्लिम धार्मिक नेते अदनान ओक्तर यांना लैंगिक गुन्ह्यासाठी 1075 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अदनानला इस्तंबूल न्यायालयाने 10 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा दिली. तेथील स्थानिक माध्यमांनी ही बातमी दिली आहे. वर्ष 2018 मध्ये, देशभरातील छाप्यात डझनभर ओक्तर विश्वासूंना अटक करण्यात आली. ते लोकांना कट्टरपंथी गोष्टींबद्दल शिकवायचे, तर दुसरीकडे महिलांना ‘मांजरी’ म्हणून संबोधत होता.

खासगी एनटीव्हीच्या वृत्तानुसार, अदनान या महिलांसोबत टीव्ही शोमध्ये नृत्य देखील करायचा ज्यांनी प्लास्टिक सर्जरी केली होती.. अदनानवर लैंगिक गुन्हा, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि राजकीय व सैनिकी हेरगिरीचा आरोप आहे. सुमारे 236 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यापैकी 78 जणांना अटक करण्यात आली आहे.

या मुस्लिम धार्मिक नेत्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुनावणीदरम्यान न्यायाधीशांना सांगितले होते की त्याला जवळपास एक हजार मैत्रिणी आहेत. तो म्हणाला होता की त्याच्या हृदयात स्त्रियांप्रती प्रेम वाढत आहे. प्रेम हे माणसाचे वैशिष्ट्य आहे मुस्लिमांचा हा गुण आहे. दुसर्‍या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला होता की, माझ्याकडे वडील होण्याची विलक्षण क्षमता आहे. सुनावणीदरम्यान एका महिलेने सांगितले की अदनानने तिच्यावर आणि इतर महिलांवर बर्‍याचदा लैंगिक अत्याचार केले.

बऱ्याच महिलांवर जबरदस्तीने बलात्कार केला आणि त्यांना गर्भनिरोधक औषधे खाण्यास भाग पाडले. अदनानच्या घरावरुन 69 हजार गर्भनिरोधक गोळ्या सापडल्या. 1990 च्या दशकात अदनान पहिल्यांदा जगासमोर आला.

Tag-Adnan Oktar/sentenced to 1075 years for sexual offenses

HSR/KA/HSR/ 13 JANUARY 2021