जगातील सर्वोच्च 10 अब्जाधीशांच्या यादीतून अदानी,अंबानींची घसरण

 जगातील सर्वोच्च 10 अब्जाधीशांच्या यादीतून अदानी,अंबानींची घसरण

मुंबई,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  अल्पावधीतच देशातील एक मोठा उद्योगसमुह म्हणून उदयास आलेल्या अदानी उद्योग समूहाला हिंडेनबर्ग’च्या अहवालानंतर ४.२ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जीच्या समभागांमध्ये गेल्या चार दिवसांत सर्वाधिक २० टक्क्यांपर्यंतची घसरण झाल्याचे दिसून आले.

 जगातील सातव्या क्रमांकाचे उद्योगपती गौतम अदाणी यांच्या उद्योगसमूहावर ‘हिंडेनबर्ग’ने गंभीर आरोप केले आहेत. अदानीप्रवर्तीत उद्योगसमूहाने दशकांपासून ताळेबंदात आणि लेखांमध्ये गैरप्रकार केल्याचं अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार संस्था ‘हिंडेनबर्ग’च्या आपल्या एका अहवालात म्हटलं आहे. यामुळे गौतम अदानी यांचे  जगातील सर्वोच्च 10 अब्जाधीशांच्या यादीतील स्थान आता घसरले आहे.

ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत घट होऊन ती आता ८४.४ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. त्यामुळे ते आता जगातील श्रीमंतांच्या यादीत अकराव्या स्थानी आहेत.

अदानी सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्यापेक्षा फक्त २.२ अब्ज डॉलरने पुढे आहे. अंबानींची संपत्ती 82.2 अब्ज डॉलर आहे आणि जगातील सर्वात श्रीमंत पुरुषांच्या यादीत ते 12 व्या क्रमांकावर आहेत. अंबानी यांना 2022 मध्ये  भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान गमावले आणि भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती हे स्थान गौतम अदानी यांनी पटकावले.
दरम्यान हिंडेनबर्ग च्या अहवाला विरोधात अदाणी समूहाकडून ४१३ पानांचं स्पष्टीकरण जाहीर करण्यात आलं आहे. त्यात  म्हटलं आहे की, “‘हिंडेनबर्ग’चा अहवाल हा भारतावर ठरवून केलेला हल्ला आहे. अदाणी समूहावरील लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. हा अहवाल म्हणजे अमेरिकास्थित कंपन्यांना आर्थिक फायदा पोहचवण्यासाठी तयार केला आहे.”
SL/KA/SL

31 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *